Description
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सवितादेवी सहस्रबुद्धे यांच्या शुश्रूषालयातून दोघं बाहेर पडले व बाजूच्या टॅक्सी स्टँडकडे बघू लागले.
‘‘एकही वाहन दिसत नाही.’’ गुरुजी आपल्या आखूडशा सफेद दाढीवर हात फिरवत म्हणाले, ‘‘तू तिथे व्हरांड्यातल्या बाकावर टेक. मी टॅक्सी, रिक्षा काही मिळतं का बघतो.’’
‘‘नको…’’ गिरिजा त्यांची बाही मागे ओढत म्हणाली, ‘‘रस्ता ओलांडायला बघाल, नीट दिसत नाही आताशा- उगाच… त्यापेक्षा मीच.’’
‘‘वेडी की काय! आत्ताच तपासणी झालीये ना तुझी? अजून रिपोर्ट…’’ गुरुजी जरा काळजीनं कडवटपणे म्हणत मागे सरले. आपल्या तरुण पत्नीकडे परकेपणानं पाहू लागले.
Reviews
There are no reviews yet.