क्लिओपॅट्रा / नीला वाटवे
₹25.00 ₹10.00
घरी आल्या आल्या विशूनं चपला कोपर्यात फेकल्या न् झटकन् खुर्चीत बसला. मघापासून उजवी टाच दुखते आहे. काय बोचलंय कुणास ठाऊक?
इतक्यात मंजू आतून आली.
‘‘काय झालं? किती येतंय रक्त.’’
हळुवारपणे त्याचा पाय उचललान. बांगडीची पिन काढून काय टोचलंय ते पाहू लागली.
‘‘काच होती. खूप दुखतंय?’’
‘‘नाही.’’ त्याचं तुटक उत्तर.
‘‘थांबा हं…’’ म्हणतच आत गेली.
तिनं डेटॉलनं जखम धुतली, हलक्या हातानं पट्टी बांधली. जुन्या, मऊ पातळाची.
तो मात्र मागे मागे जातो. तिच्यापासून खूप दूर. त्याला आठवते ती ट्रिपमधली संध्याकाळ. त्याची न् अनूची. इतरांची नजर चुकवून दोघंच मागे राहतात. त्या गर्द हिरव्या पाऊलवाटेवरून चालत दोघं त्या ओढ्याकाठी येतात.
‘‘ए, बसू या का इथे?’’ त्याचा आग्रह.
‘‘चल!’’ ती पण खुषीत.
तिला जाणवतं तो वेडा झालाय, हळवा झालाय. हळूच त्याचा हात आपल्या हातात घेऊन दाबते. तो पटकन् उठतो. त्याच्या डोक्यात कुठल्या वेळेस काय शिजेल नेम नसतो. ती न बोलता बघत असते. तिच्या पावलावर ओंजळभर पाणी शिंपडतो.
‘‘अरे, हे काय वेड्यासारखं?’’
‘‘तुला नाही कळायचं.’’
‘‘वेडोबा आहेस.’’
Reviews
There are no reviews yet.