बोन फ्रॅक्चर / श्रीधर र. दीक्षित
₹25.00 ₹10.00
आयुष्यात काही क्षण बहुमोल असतात.
असाच एक क्षण मी काल टिपलाय. त्या क्षणाची किंमत करावी तितकी कमीच होणार, अगदी मणिकांचन योगाप्रमाणे मला तो क्षण लाभलाय.
अनादिकालापासून अनंत कालापर्यंत ज्याचं नाव आम्ही क्षुद्र मानव घेत राहणार त्या नश्वर ईश्वराचा मी मनःपूर्वक आभारी आहे. कारण त्याच्याच इच्छेमुळे तो क्षण मला लाभू शकला. हे एक पूर्ण सत्य आहे.
कालच्या त्या क्षणाची आठवण होत असतानाच मला आठवतेय ती रात्र… अंधारी… अमावास्येची… डोळ्यांना अंधाराशिवाय काहीच न दिसणारी…
मी नाशिकहून इंदूरला प्रथमच आलो होतो.
खांडवा–अजमेरची ती गाडी रात्री दोनच्या सुमारास इंदूरला पोचली. मी उतरलो. जवळ विशेष सामान नव्हतं. स्टेशन न्याहाळलं. छानदार आहे. मध्य रेल्वेच्या इतर स्टेशनांसारखं ते रखरखीत नाही. निऑनच्या नळ्यांनी ते झगमगून उठतं. सिनेमाची असंख्य पोस्टर्स बघत बघत मी स्टेशनातून बाहेर पडलो.
सुर्रकन एक टॅक्सी मी उभा होतो तिथे आली आणि कच्चकन ब्रेक लागून थांबली. ड्रायव्हरनं तोंडातली सिगारेट दूर केली. विचारलं,
‘‘साब, टॅक्सी?’’
मी त्याला न्याहाळलं. नवख्यानं न्याहाळावं तसं. त्याला तसं न्याहाळात असताना उत्तर द्यायला उशीर झाला. त्यानंच पुन्हा विचारलं,
‘‘साब, कहाँ जाना है?’’
एव्हाना मी माझा खिसा चाचपून एक कागद काढला, ‘‘नंदा नगर, घर नंबर १८’’ असं म्हटलं. टॅक्सीत चढलो आणि ‘‘चलो’’ म्हणालो.
Reviews
There are no reviews yet.