Description
ते एक तळं होतं. कोकणातल्या चोळणा गावातल्या लक्ष्मीनारायणाच्या देवळापुढचं ते तळं.
त्या तळ्याला चांगल्या पंधरा-वीस पायर्याव होत्या. पावसाळ्यात या सार्या पायर्याच बुडून जायच्या. इतक्या की तळ्याला पायर्यार आहेत हे सांगावं लागायचं.
पावसाळ्यात तळ्याच्या पायर्याण बुडाल्या, तळ्याची मूस वाहायला लागली, की तळ्याच्या दोन्ही बाजूंना लागलेल्या चिर्या्च्या खाणीत कमळांची दाटी व्हायची. खाणीच्या चिरेकपार्या, इथे आहेत हे त्या कमलिनी आपल्या अस्तित्वानं दाखवून द्यायच्या. तळ्याचा मधला गोल मात्र अबाधित राहायचा.
पावसाळ्यात तळ्याच्या बाजूला हिरवंकंच गवत उगवायचं. निळ्याभोर आकाशाचं आणि बाजूच्या हिरव्यागार सृष्टीचं प्रतिबिंब त्यात उमटायचं आणि तळ्याचं पाणी निळसर हिरवट भासायचं.
Reviews
There are no reviews yet.