Description
कीर्तिकरांच्या बंगल्याजवळ सुजातानं रिक्षा उभी केली. बंगल्याच्या फाटकाशी जाईपर्यंत तिच्या नजरेनं अनेक गोष्टी टिपल्या. फाटकावर मधुमालतीचे वेल चढले होते. फांदी-फांदी फुलांच्या गुच्छांनी बहरली होती. आत बंगल्यापर्यंत जाणार्याा पायवाटेच्या दोन्ही बाजूंना गुलाबाचे ताटवे फुलले होते. कंपाऊंडला लागून अशोकाचे चार वृक्ष हिरवीगार पानं लेवून उभे होते. मनमोहक निळ्या टाइल्सनं बांधलेलं छोटंसं कारंजं डाव्या बाजूला दिसत होतं. बंगल्याभोवतीची दाट हिरवळ डोळ्यांना सुखावत होती.
बंगल्याच्या दारापर्यंत पोचल्यावर सुजाताच्या हृदयाची धडधड वाढली. अपार आतुरता आणि किंचित भय अशा संमिश्र भावनेनं तिनं बेल वाजवली. पक्ष्यानं साद घालावी तसा मंजुळ नाद आतून ऐकू आला. काही सेकंदांतच दार उघडलं गेलं.
Reviews
There are no reviews yet.