Description
किशोर तिथे पोचला, तेव्हा लंचटाईमची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. हातातल्या घड्याळात पाहिल्याबरोबर तिथे पोचायला वेळ झाल्याची त्याला जाणीव झाली. त्याबरोबरच तो स्वत:वर चिडला. परत जाण्यासाठी तो वळणार तोच कोपर्यायतली ती जागा अजून रिकामीच असल्याचं त्याच्या लक्षात आलं. मग मात्र जवळ जवळ धावतच जाऊन त्यानं ती अडवली. सीटवरच्या फोम रबरच्या गादीनं त्याच्या या धसमुसळेपणाबद्दल तक्रारही केली, पण तिकडे लक्ष देण्याइतकं आज त्याचं मन थार्यादवर नव्हतं.
Reviews
There are no reviews yet.