Description
ही माझीच गोष्ट. अगदी सुरुवातीची! सर्वांनाच सांगावी असं खूप वाटतंय, पण धीर होत नाहीये. जाहीरपणे सांगावी असंही वाटतंय खूप, पण छे! जमणार नाही मला. म्हणजे झेपणारच नाही. राग येतो माझा मलाच. माझ्याभोवती असलेल्या चौकटींचा. माझ्यावर लादलेल्या तथाकथित सुसंस्कृत सभ्यतेचा! सारी बंधनं आणि चौकटी झुगारून देऊन वाटतं, ओरडून सांगावं सार्यांाना ‘त्या’ वेळी नेमकं काय झालं ते! माझा तो जिवंत, रसरशीत अनुभव! मी भोगलेला तो क्षण! आत खोल कुठेतरी जाऊन भिडलेला, पण मी नाही बोलू शकत. माझ्या नावनिशीवार नाही लिहू शकत. त्यासाठीच माझा आत्मा आतल्याआत तळमळतोय. मध्यरात्रीसुद्धा मी भुतासारखी उठून बसते. खूप ओरडावं, रडावं असं वाटतं. काही वेळा तसं घडलंही. मनावर ताबा न राहून मी झोपेतून उठून मोठ्यानं रडू लागले. सारं घर माझ्याभोवती गोळा झालं. मला अंजारू-गोंजरू लागलं. माझ्यावर खोल मानसिक परिणाम झालाय म्हणून सांभाळू लागलं. माझ्या नवर्या नं पुन्हा पुन्हा सांगितलं, की ‘आम्ही कुणीही तुला अपराधी समजत नाही. झाली घटना विसरून जा. फक्त पुढे सावधपणानं वाग.’
Reviews
There are no reviews yet.