Description
ऑफिसातून बाहेर पडायला थोडा उशीरच झाला. कागदपत्रांचे डोंगरच डोंगर पडले होते. स्टेटमेंट्स जायची होती. टायपिंगला पेपर दिले होते ते अजून आले नव्हते. खरंतर अजून काही वेळ बसायला हवं होतं, पण त्या सगळ्याच वातावरणाचा कंटाळा आला होता. किळस आल्यासारखी झाली होती. शैलजानं कागद आवरले आणि ती बाहेर पडली. नेहमी तिच्याबरोबर सरिता तरी असेच. ऑफिसमधून स्टेशन, लोकलची गर्दी, खच्चून भरलेला फलाट, घामाचा वास, दीड तासाचा प्रवास… आणि मग घर!… सप्त समुद्र पार करून जाण्यापैकी तो प्रकार होता. सरिता असली की तेवढंच बरं वाटे. गप्पागोष्टी करता येत. मन मोकळं होई. दुसर्याा दिवसाशी सामना करायला पुन्हा धीर येई.
Reviews
There are no reviews yet.