तो, ती आणि नियती! / सदानंद सामंत
₹25.00 ₹10.00
तो… १९६४
जॉर्ज फर्नांडिसची ‘मुंबई बंद’. रस्त्यावर वाहनांचा शुकशुकाट. गाफीलपणे, बेफिकीरपणे चालणारे पादचारी. कसेही रस्ते ओलांडणारे लोकांचे थवे. नाक्यानाक्यावर चर्चा करणारी रिकामटेकडी टोळकी… शहरावर निष्क्रियतेचा दाट तवंग. आकाशातून ओतणारं औदासीन्य… तो एकटाच नाक्यावर उभा असतो. तोकडी काळी पँट. मफतलाल मिल्सचा चौकड्यांचा कोपरापर्यंत दुमडलेला शर्ट, पायांत फाटक्या वहाणा, हातात जळती सिगारेट, खिशात बेचाळीस पैशांची चिल्लर, मस्तकात कल्पनेचं सुरसुरणारं कारंजं… करंट आल्याप्रमाणे तो रस्ता ओलांडतो. फाटक्या वहाणा तुटता कामा नयेत या खुबीनं. समोरच्या पडक्या भिंतीवर ‘संगम’चं भलं थोरलं पोस्टर. राजेंद्रकुमार अन् राज कपूरच्या मधे हातात हात गुंफलेली वैजयंतीमाला. तो जळती सिगारेट फेकतो. तो दुसरी सिगारेट पेटवणार एवढ्यात त्याचं सर्व शरीर पेट घेतं. समोरून, अगदी नाकासमोरून, अगदी सरळ रेषेत मैथिली येत असते. तिचं ओळखीचं, सलगीचं स्मित करते. तो मान फिरवणार एवढ्यात ती बडबडते, ‘‘मिस्टर सिनिक्….आय मीन शिशिरकुमार चौधरी…’’ त्याची मुद्रा पाषाणाची होते. ओठ दाबून तो तिला टिपतो. हाताच्या बोटांत बटवा फिरवण्याची तीच पद्धत. जीभ ओठांवरून फिरवून लाडे लाडे बोलण्याची तीच लकब. एक पाय तिरका करून उभं राहण्याचं तेच वैशिष्ठ्य, शरीरावर पिकॉक ग्रीन साडी. बॉटलग्रीन ऑरगंडीचा तंग ब्लाऊज, डोक्यावर केसांचं घरटं. सुवर्णकांतीचा देह–देव्हारा. आता काहीतरी बोललंच पाहिजे म्हणून तो म्हणतो, ‘‘मैथिली…’’
तोंडावर हात नेत खळकन हसत ती म्हणते, ‘‘पूर्वाश्रमीची मैथिली! आता सौ. सुनयना कोतवाल.’’ तो थोबाडीत मारल्यासारखा होतो. मनाला चुचकारत, काळजाला गोंजारत तो कसाबसा बडबडतो, ‘‘म्हणजे तू… म्हणजे तुझं लग्न झालं तर…’’
‘‘मी लग्न केलं…’’
Reviews
There are no reviews yet.