Description
उषाला तो दिसला आणि ती दचकली. कावरीबावरी झाली. घाबरलीसुद्धा. बाजारातून ती रमतगमत चालली होती. तिच्या बोटाला धरून बंटी चालत होता.
तिला वाटलं, त्यानं बघितलं नसावं. पण गर्दीतून वाट काढत तो झपाझप पावलं टाकत तिच्याच दिशेनं येत होता. क्षणभर तिची आणि त्याची दृष्टादृष्ट झाली. तिनं बंटीला खेचलं. त्याला चुकवण्यासाठी रस्ता क्रॉस केला आणि टॅक्सीज व कार्सच्या रांगांमधून ती पलीकडच्या फुटपाथवर गेली. तिथून एका उडप्याच्या हॉटेलात शिरली.
‘‘मम्मा! मम्मा! काय झालं मम्मा?’’ बंटी विचारत होता, पण तिचं लक्ष समोरच्या फुटपाथवर होतं. तो कुठे दिसतोय का हे ती न्याहाळून बारकाईनं बघत होती. फुटपाथवर तरी तो तिला रेंगाळताना दिसला नाही. तिला थोडं हायसं वाटलं.
Reviews
There are no reviews yet.