Description
‘‘सद्या, अरे तू उन्हात उभा का? बस इथे.’’ सदाशिवनं किंचित वैतागून तात्यांकडे नजर टाकली. तात्या वाड्याच्या मागील दारी असलेल्या त्या पिंपळाच्या पाराखाली बसले होते. बाजूला ठेवलेल्या कापडी पिशवीतून त्यांनी लहानसा पंचा बाहेर काढला आणि कपाळावरचा, मानेवरचा घाम पुसून काढला. पण हे सर्व करताना त्यांची नजर कामतांच्या वाड्याच्या मागच्या दरवाजावर खिळलेली होती. तो लाकडी दरवाजा बंद नव्हता, नुसताच लोटलेला होता. अपेक्षेनं भरलेले तात्यांचे डोळे ज्या पद्धतीनं त्या दारावर खिळलेले होते ते सदाशिवला बघवेना. मघापासून उभं राहून त्याच्या पायाला रग लागली होती. एका पायानं दुसर्याे पायाला घासत तो निक्षून म्हणाला, ‘‘नको. मी उभाच राहतो.’’
त्याच्या आवाजातल्या वैतागाकडे तात्यांचं लक्ष नसावं. पंचाची घडी करता करता ते म्हणाले, ‘‘हे बघ सद्या, आबाजी दिसले की पहिल्यांदा पाया पडायचं.’’
Reviews
There are no reviews yet.