Post Masonry – Style 1

प्रेमभंग | चंद्रकांत पै

आपण काही सांगितलं, तरी लोक समजायचं ते समजतात. नाहीतरी माणूस हल्ली इतकं खोटं बोलायला लागलाय, की खरं सांगितलं, तरी ऐकणारा त्याच्या उलटच ऐकतो. म्हणून मी ठरवलंय, की खरं तेच सांगायचं. शैलाविषयी कुणीही…

प्रेमभंग / चंद्रकांत पै / मेनका / जून १९७३

आपण काही सांगितलं, तरी लोक समजायचं ते समजतात. नाहीतरी माणूस हल्ली इतकं खोटं बोलायला लागलाय, की खरं सांगितलं, तरी ऐकणारा त्याच्या उलटच ऐकतो. म्हणून मी ठरवलंय, की खरं तेच सांगायचं. शैलाविषयी कुणीही…

सावरे कहा लगायी देर / अनुराधा गुरव / मेनका / जुलै १९७४

शहाजीराव देशमुखांच्या प्रशस्त वाड्यामध्ये आज गडबड दिसत होती. पाहुण्यांच्या खोलीतलं फर्निचर स्वच्छ, लखलखीत केलेलं होतं. फरशी चमकत होती. दारं-खिडक्यांचे पडदे, खुर्च्यांची कुशन्स, बॅकर्स, टेबलक्लॉथ, बेडशीट्स परीटघडीची होती. झुळझुळीत होती. कोपर्‍यातल्या फ्लॉवरपॉटमध्ये ताजी…

क्लिओपॅट्रा / नीला वाटवे / मेनका / फेब्रुवारी १९८०

घरी आल्या आल्या विशूनं चपला कोपर्‍यात फेकल्या न् झटकन् खुर्चीत बसला. मघापासून उजवी टाच दुखते आहे. काय बोचलंय कुणास ठाऊक? इतक्यात मंजू आतून आली. ‘‘काय झालं? किती येतंय रक्त.’’ हळुवारपणे त्याचा पाय…

सुखरूप / अनंत फाटक / मेनका / दिवाळी १९७०

मंगळागौरीसारख्या मंगलसमयी सुवासिनींनाच काय ते आमंत्रण असतं. पुरुषमंडळींना मंगळागौर पुजण्याचा अधिकारच नाही म्हणे! ठीक आहे, पण कधीकधी काहींना आपल्या सुवासिनींना म्हणजे सौभाग्यवतींना मंगळागौरीच्या घरी पोचवण्याचा प्रसंग येतो. कधीकधी सौ. आत जातात आणि…

बोन फ्रॅक्चर / श्रीधर र. दीक्षित / मेनका / एप्रिल १९७२

आयुष्यात काही क्षण बहुमोल असतात. असाच एक क्षण मी काल टिपलाय. त्या क्षणाची किंमत करावी तितकी कमीच होणार, अगदी मणिकांचन योगाप्रमाणे मला तो क्षण लाभलाय. अनादिकालापासून अनंत कालापर्यंत ज्याचं नाव आम्ही क्षुद्र…

तो, ती आणि नियती! / सदानंद सामंत / मेनका / एप्रिल १९७२

तो… १९६४ जॉर्ज फर्नांडिसची ‘मुंबई बंद’. रस्त्यावर वाहनांचा शुकशुकाट. गाफीलपणे, बेफिकीरपणे चालणारे पादचारी. कसेही रस्ते ओलांडणारे लोकांचे थवे. नाक्यानाक्यावर चर्चा करणारी रिकामटेकडी टोळकी… शहरावर निष्क्रियतेचा दाट तवंग. आकाशातून ओतणारं औदासीन्य… तो एकटाच…

राणी / चंद्रप्रभा जोगळेकर / मेनका / ऑगस्ट १९६७

दिल्लीच्या कॅनॉट प्लेस विभागाचा झगमगाट न्याहाळत मी रेंगाळत चालत होतो. राज कपूरचा गाजलेला चित्रपट ‘जिस देश में गंगा बहती है’ पाहण्याच्या इराद्यानं निघालो होतो. थिएटरच्या भिंतींवरची पद्मिनीची उत्तान चित्रं मी जवळपास रोज…

एका कादंबरीची सुरुवात… / गुरुनाथ धुरी / मेनका / मार्च १९८४

अंगात विलक्षण थकवा दाटून यावा तशी कातरवेळ खिडक्यांच्या काचांवर साकळून आली होती. श्रांतपणे खांद्याची पर्स उतरून टेबलावर ठेवताना तिनं पाहिलं, कपड्यांचे बोळे आपण घराबाहेर निघताना पडले होते तसेच अजूनही फर्निचरवर पडले होते.…

डार्करूम / ज्योत्स्ना देवधर / मेनका / दिवाळी १९८५

सकाळी उठून नेहमीप्रमाणे विक्रमनं चांगला तीन कप चहा केला. किटलीत गाळला. दुधाचं भांडं, कपबशी आणि खारी असा सगळा सरंजाम ट्रेमध्ये मांडला. स्वतःवरच खूष होत त्यानं आपल्या आवडत्या खुर्चीजवळ टीपॉय ओढून त्यावर ट्रे…

धुमारे / ज्ञानेश्‍वर नाडकर्णी / मेनका / दिवाळी १९७५

कॉलनीच्या पटांगणात बॅडमिन्टनचा खेळ चाललेला होता आणि गॅलरीच्या कठड्याला रेलून माधवराव तो पाहत होते. खरं म्हणजे जरी त्यांची नजर केळाकडे लागलेली होती, तरी त्यांचं लक्ष काही पूर्णपणे तिथे नव्हतं. बॅडमिन्टनचं पांढरं फूल…

एक पूर येऊन गेला / ग. वा. बेहेरे / मेनका / दिवाळी १९७५

फोटोसाठी आम्ही सर्वजण उभे राहिलो. मग आपापल्या मानाप्रमाणे खुर्च्यांवरही बसलो. काहीजण मागे उभे राहिले. फोटोग्राफरच्या सूचनेप्रमाणे जवळ-अधिक, उंच-ठेंगू, असे क्रमही बदलण्यात आले. फोटोग्राफरच्या चेंगटपणामुळे आणि अतिरेकी सूचनांमुळे उकाड्याचा त्रास वाढत होता. मला…