केवळ एक घटना नराचा पशू कशी करते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सायको किलर अविनाशचं जिवंत उदाहरण. एखादी घटना माणसाचं आयुष्य कोणत्या वळणावर घेऊन जाईल, हे सांगणं अशक्य. पण त्या गुन्ह्यामुळे जर अट्टल…
रत्नागिरी हापूस, सोलापुरी चादर, कोल्हापुरी चप्पल, दार्जीलिंग चहा यांच्या बरोबरीनं कोल्हापुरी पद्धतीचा साज, ठुशी आणि टिका यांसारख्या पारंपरिक दागिन्यांसाठीही भौगोलिक स्थाननिश्चिती (Geographical Indication) करण्याची आवश्यकता आहे. भौगोलिक स्थाननिश्चितीचा उपयोग ज्या त्या स्थानामुळे…
आपल्याकडे लग्न हा ‘सोहळा’ असतो. साहजिकच त्यामध्ये अनेक गोष्टी, सोपस्कार येतात. परिणामी तयारीही कंबर मोडेपर्यंत आणि रात्रीचा दिवस करून करावी लागते. पण प्रत्येकानंच आपल्या घरातलं कार्य समजून लग्नघरातल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर…
‘सिंधुआज्जी कोण आहेत?’ हा प्रश्न थोडा जटील आहे. सिंधुआज्जी अर्क आहेत. तरुण तुर्क म्हातारे अर्क या अर्थी नाही; तर जगरहाटीची फारशी तमा न बाळगता आपल्या लॉजिकनं आपलं आयुष्य जगायच्या इच्छेचा अर्क. त्यांचा…
शाळेत डेव्हिड हा नव्यानं रुजू झालेला अमेरिकन शिक्षक होता. असाच ३१ डिसेंबर आला आणि त्यानं सहज नववीच्या मुलांना ‘माझे नव्या वर्षातले संकल्प’ असा निबंधाचा विषय लिहायला दिला. वह्या तपासायला म्हणून दुसऱ्या दिवशी…
मीरा आजही तशीच चुपचाप बसली होती. गरगरणाऱ्या पंख्याकडे बघत. शिकवणीची मुलं येऊन गेली होती. आता दुसरी बॅच थेट संध्याकाळीच होती. नेहमीप्रमाणे अख्खी दुपार तिला खायला उठणार होती. भाड्याच्या दुसऱ्या माळ्यावरच्या या घरात…