सुखरूप / अनंत फाटक / मेनका / दिवाळी १९७०
मंगळागौरीसारख्या मंगलसमयी सुवासिनींनाच काय ते आमंत्रण असतं. पुरुषमंडळींना मंगळागौर पुजण्याचा अधिकारच नाही म्हणे! ठीक आहे, पण कधीकधी काहींना आपल्या सुवासिनींना म्हणजे सौभाग्यवतींना मंगळागौरीच्या घरी पोचवण्याचा प्रसंग येतो. कधीकधी सौ. आत जातात आणि हे बाहेरच थांबलेले दिसतात. कधी मोटारमध्ये ड्रायव्हरच्या जागी, तर कधी स्कूटरवर फडके मारत, तर कधी रस्त्यावरून जाणार्या-येणार्या सुवासिनी-कुमारिका न्याहाळत. वेळ कसा तरी घालवत असतात. एखाद्या वेळी सौ. आत गेल्यावर त्या तुम्हाला बाहेर थांबायला सांगून गेल्या आहेत, हेच विसरून जातात. कधीकधी त्या घरच्या माणसाला तुम्ही बाहेर थांबले असल्याची कल्पना आलीच, तर तुम्हाला आत बोलावलं जातं. आणि ‘इथे पुरुषांचे काही काम नाही’ असं तुम्हाला कुणीतरी सुनावतं, पण समोर फराळानं भरलेली ताटली, पत्रावळ आल्याखेरीज मात्र राहत नाही. निदान सरबत, चहा, कॉफी, कोको यांपैकी काहीतरी पेय, तुम्ही खोटंच ‘नको नको’ म्हणत असतानाच तुम्हाला प्यायला मिळतं, आणि त्याबरोबर नयनसुखही मिळतं. बाजूला, समोर, आसपास सौंदर्यानं, दागिन्यांनी, उत्तमोत्तम साड्यांनी नटलेल्या, रसरसलेल्या ललना तुमच्याकडे कुतूहलानं पाहत पाहत ‘हे कुणाचे गं’ असं एकमेकींच्या कानांत पुटपुटत, मुरडत मुरडत चालताना दिसतात. तुमच्याबद्दलची सर्वसाधारण माहिती नि काही विशेष इकडे तिकडे पसरायला, कर्णोपकर्णी व्हायला थोडाच वेळ लागतो नि मग त्या कुतूहलानं पाहणार्या डोळ्यांतलं कुतूहल वाढतं, त्याबरोबर तुमचं नयनसुख पण वाढतं.
या अशाच एका मंगळवारी, मंगळगौरीदिनी मी सौ.ना पोचवायला म्हणून एका कार्यालयात गेलो. सदाशिव पेठेतल्या. सौ. आधीच आत पळाल्या. उशीर झाला होता ना! त्यांनाच नटायला किती वेळ लागतो. मीही गाडीच्या काचा वर करून, गाडीला लॉक लावून आत गेलो. माझी ओळख होती. त्यामुळे आत जायला काहीच हरकत नव्हती. ‘या’ असे म्हणत दुसरे एक माझ्या पाहण्यातले गृहस्थ जागचे हलले. शेजारच्या मोकळ्या जागेवर हातानं थाप मारत परत एकदा ओरडले, ‘‘या या बापूराव, हे असं केव्हापासून जायला लागतात ?’’ ते फिदीफिदी हसले. मी निर्विकार चेहरा करून त्यांच्याकडे पाहिलं नि त्यांनी दर्शवलेल्या जागेवर जाऊन बसलो. इतक्यात खुद्द तरुण यजमानच हसत हसत माझ्याकडे आले,
‘‘चला बापूराव, आपण तिकडे बसूया आरामात. घाई नाही ना?’’
‘‘नाही.’’
सशुल्क कथा
रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा व कथेचा मनमुराद आनंद घ्या!
सुखरूप / अनंत फाटक
₹25.00 ₹10.00