Now Reading
वीज / आशा बगे / मेनका / मार्च १९७६

वीज / आशा बगे / मेनका / मार्च १९७६

View Gallery
केव्हातरी त्या दोघांचीच असलेली गोष्ट आता केवळ त्यांचीच म्हणून राहिली नाही. तरीही एका अनावर पण निर्भय अगतिकतेनं ती फक्त त्यालाच बांधली आहे, हे जेव्हा त्याला अकल्पितपणे कळलं, तेव्हा तो गडबडून गेला. सन्डे... दादरचा भरलेला वाहता रस्ता... बिल चुकतं करून मि. कर्णिक त्या डिपार्टमेन्टल स्टोअर्सच्या पायर्‍या उतरत होते आणि हाक आली, ''कुमार... कुमार... थांब.'' या हाकेनं ती संपलेली गोष्ट आपल्याकरता पुन्हा सुरू होईल, असं मि. कर्णिकांना मुळी वाटलंच नाही. फार काय, ती हाक आपल्यासाठीच आहे, हेदेखील त्यांच्या उशिराच ध्यानात आलं. ती जवळ आली. तिच्या नुसत्या अस्तित्वाचा जो एक परिचित गंध होता, त्यानंच 'कुमार'चा अर्थ जाणिवेपर्यंत पोचला. ''कुमार! व्हाट ए प्लेझंट सरप्राईज?'' ती अतिशय आनंदली होती. तो भेटल्याचा आनंद शब्दातून, तिच्या सार्‍या हालचालीतून डोकावत होता. निर्भयपणे. त्यात कोणताही ओशाळेपणा नव्हता. जे घडून गेलं त्याच्या काळ्या कडांची पुसटशी किनारही नव्हती. त्यांना मात्र सावरायला, भानावर यायला जरा वेळच लागला. त्यांना तिच्यापुढे थोडं दुबळं, आक्वर्ड आणि असुरक्षित वाटायला लागलं. ''काल मुंबईत पाऊल ठेवल्यापासून ठरवलं होतं तुला भेटायचं. पत्ता वगैरे माहीतच नव्हता. तुझ्या ऑफिसला फोन करणार होते, पण तूच भेटलास. हाऊ नाइस! मिसेस कुमार कुठायत?'' तिनं अपेक्षेनं आजूबाजूला पाहिलं. पण वीणा गाडीत जाऊन बसली होती आणि मुख्य म्हणजे मि. कर्णिक अजून अ‍ॅडजस्ट झाले नव्हते. ते सारं काही एवढं जुनं नव्हतं तरीही...

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा व कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.