विषम / अरविंद गोखले / मेनका / दिवाळी १९८६
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सवितादेवी सहस्रबुद्धे यांच्या शुश्रूषालयातून दोघं बाहेर पडले व बाजूच्या टॅक्सी स्टँडकडे बघू लागले.
‘‘एकही वाहन दिसत नाही.’’ गुरुजी आपल्या आखूडशा सफेद दाढीवर हात फिरवत म्हणाले, ‘‘तू तिथे व्हरांड्यातल्या बाकावर टेक. मी टॅक्सी, रिक्षा काही मिळतं का बघतो.’’
‘‘नको...’’ गिरिजा त्यांची बाही मागे ओढत म्हणाली, ‘‘रस्ता ओलांडायला बघाल, नीट दिसत नाही आताशा- उगाच... त्यापेक्षा मीच.’’
‘‘वेडी की काय! आत्ताच तपासणी झालीये ना तुझी? अजून रिपोर्ट...’’ गुरुजी जरा काळजीनं कडवटपणे म्हणत मागे सरले. आपल्या तरुण पत्नीकडे परकेपणानं पाहू लागले.
‘‘तपासणी नावाची! तुमचा आग्रह म्हणून. मी अगदी ठणठणीत आहे. तुम्हालाच म्हातारपणामुळे सगळ्याचं भय वाटू लागलंय.’’ गिरिजा उसना आव आणत दूर दिसणाऱ्या रिक्षाला हात करू लागली. नवऱ्याची बाही अधिकच आवळू लागली.
शुश्रूषालयाच्या पायऱ्यांवर कितीतरी वेळ ताटकळत ते जगावेगळं जोडपं अवघडून उभं होतं. दवाखान्यापासून दूर, आपल्या विद्यालयाच्या आवारात जाण्यासाठी. दवाखान्यात जाण्याचं, वैद्यकीय तपासण्या करण्याचं वय झालं होतं खरंतर गुरुजींचं आणि विद्यालय चालवण्याचं बळ आता हवं होतं गिरिजाजवळ, पण झालं होतं सगळं उलट, अघटित. चाळिशी येण्यापूर्वीच गिरिजेला असाध्य रोगाचा संशय आणि त्यामुळे साठी सरलेल्या गुरुजींचा उगाच उसना आवेश.
साठी उलटण्याआधीच काही वर्षं शेंडे गुरुजींची तारुण्य ओसरत असलेल्या कुमारी गिरिजा अग्रवालशी गाठ पडली.
सशुल्क कथा
रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा व कथेचा मनमुराद आनंद घ्या!
विषम / अरविंद गोखले
₹25.00 ₹10.00