बळीचं तळं / स्नेहल जोशी / मेनका / जानेवारी १९९४
ते एक तळं होतं. कोकणातल्या चोळणा गावातल्या लक्ष्मीनारायणाच्या देवळापुढचं ते तळं.
त्या तळ्याला चांगल्या पंधरा-वीस पायऱ्या होत्या. पावसाळ्यात या साऱ्या पायऱ्याच बुडून जायच्या. इतक्या की तळ्याला पायऱ्या आहेत हे सांगावं लागायचं.
पावसाळ्यात तळ्याच्या पायऱ्यापण बुडाल्या, तळ्याची मूस वाहायला लागली, की तळ्याच्या दोन्ही बाजूंना लागलेल्या चिऱ्याच्या खाणीत कमळांची दाटी व्हायची. खाणीच्या चिरेकपाऱ्या, इथे आहेत हे त्या कमलिनी आपल्या अस्तित्वानं दाखवून द्यायच्या. तळ्याचा मधला गोल मात्र अबाधित राहायचा.
पावसाळ्यात तळ्याच्या बाजूला हिरवंकंच गवत उगवायचं. निळ्याभोर आकाशाचं आणि बाजूच्या हिरव्यागार सृष्टीचं प्रतिबिंब त्यात उमटायचं आणि तळ्याचं पाणी निळसर हिरवट भासायचं.
सशुल्क कथा
रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा व कथेचा मनमुराद आनंद घ्या!
बळीचं तळं /स्नेहल जोशी
₹25.00 ₹10.00