Now Reading
प्रीत किये दुख होय / स्मिता प्रकाश मेढी / मेनका / जानेवारी १९९२

प्रीत किये दुख होय / स्मिता प्रकाश मेढी / मेनका / जानेवारी १९९२

कीर्तिकरांच्या बंगल्याजवळ सुजातानं रिक्षा उभी केली. बंगल्याच्या फाटकाशी जाईपर्यंत तिच्या नजरेनं अनेक गोष्टी टिपल्या. फाटकावर मधुमालतीचे वेल चढले होते. फांदी-फांदी फुलांच्या गुच्छांनी बहरली होती. आत बंगल्यापर्यंत जाणार्याा पायवाटेच्या दोन्ही बाजूंना गुलाबाचे ताटवे फुलले होते. कंपाऊंडला लागून अशोकाचे चार वृक्ष हिरवीगार पानं लेवून उभे होते. मनमोहक निळ्या टाइल्सनं बांधलेलं छोटंसं कारंजं डाव्या बाजूला दिसत होतं. बंगल्याभोवतीची दाट हिरवळ डोळ्यांना सुखावत होती.

बंगल्याच्या दारापर्यंत पोचल्यावर सुजाताच्या हृदयाची धडधड वाढली. अपार आतुरता आणि किंचित भय अशा संमिश्र भावनेनं तिनं बेल वाजवली. पक्ष्यानं साद घालावी तसा मंजुळ नाद आतून ऐकू आला. काही सेकंदांतच दार उघडलं गेलं.

‘‘सुजाता तोरणे?’’ दार उघडणार्या तरुणीनं विचारलं.

‘‘हो. मी काल फोनवर...’’

‘‘या ना. काका तुमचीच वाट बघताहेत.’’

सुजाता त्या तरुणीच्या मागून आत शिरली.

‘‘काका त्यांच्या अभ्यासिकेत आहेत. तिकडेच बोलावलं आहे तुम्हाला.’’

‘‘काकाऽऽ’’ त्या तरुणीनं हाक मारली.

See Also

‘‘ये ये.’’ आरामखुर्चीत बसलेल्या व्यक्तीनं तिला बोलावलं.

कीर्तिकर!

सुजाताच्या हृदयाचा एक ठोका चुकला.

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.