Now Reading
नांगी / अरविंद गोखले / मेनका / दिवाळी १९७०

नांगी / अरविंद गोखले / मेनका / दिवाळी १९७०

मी लग्न करायचं ठरवलं, अन् माझ्या ध्यानात आलं, की असं मी ठरवून काही उपयोग नाही. माझं लग्न दुसर्‍यांनी ठरवलं पाहिजे. मी नुसता निश्‍चय करून, मनाची नि शरीराचीही तयारी करून काही घडणार नाही. भोवतालच्या लोकांनी मनावर घ्यायला हवं, मदतीला सरसावायला हवं. माझं लग्न जमवून द्यायला हवं.

मी जेव्हा लग्न करायचं नाही, आयुष्यभर अविवाहित राहायचं, असं म्हणत होते, तेव्हा कितीतरी लोक भोवती गोळा होत होते. कुतूहलानं, काळजीनं. काळी व लुकडी का असेना, पण थोडासा पैसा नि शिक्षण असलेली अन् चांगली सव्वीस वर्षांची स्वतंत्र स्त्री नवरा न करता, संसार न थाटता जगू पाहते याचं सार्‍यांना नवल वाटत होतं. माझं काही चुकतंय, मी फसतेय, असं एकजात सर्वांना वाटायचं. मी वेडेपणा करू नये, वेळीच लग्न करून चारचौघींसारखा सरळ संसार करावा, असं प्रत्येकजण सांगत. शेजारी, नात्यातले, स्नेहातले, म्हातारे, संसार थाटलेले, अन् अजून लग्नाचं वय न झालेलेही. माझी मतं विचारायचे, माझ्या अटी विचारायचे, मला स्थळं सुचवायचे, मला सल्ला द्यायचे. लग्न न करायला मला खास असं काही कारण नव्हतं. नवरा नि संसार आड येईल असं ध्येय डोळ्यांपुढे नव्हतं, की कुणावर प्रेम जडलं नव्हतं. लग्नाचा विचारच मला फारसं वेडं करत नव्हता. कुणासाठी तरी जीव ओवाळून टाकावा अशी ओढ लागली नव्हती. कुठल्या तरी कुटुंबात आपलं एकटं, स्वतंत्र आयुष्य अडकवून घ्यावं, अशी गरजच भासत नव्हती. मी उगाचच अविवाहित राहिले होते, एवढंच.

पण मग सव्विसावं वय सरलं, सत्ताविसावं उलटलं, अन मग वाटू लागलं की असं अर्थहीन, एकसूत्र आयुष्य आता पुरे. असंच वय वाढलं, वेळ गेला तर आपल्याला नवरा मिळायचा नाही. मुलंबाळं व्हायची नाहीत. एकटेपणानं अखेर आपण वेडे होऊ. एकटं जगायचीच मला भीती वाटू लागली. अन् आई अंतरली, तेव्हा मी तिच्या बाराव्याला जाहीर केलं, मला लग्न करायचंय. मला नवरा हवाय!

See Also

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.