नर / श्री. ज. जोशी / मेनका / दिवाळी १९७०
ऑफिसातून बाहेर पडायला थोडा उशीरच झाला. कागदपत्रांचे डोंगरच डोंगर पडले होते. स्टेटमेंट्स जायची होती. टायपिंगला पेपर दिले होते ते अजून आले नव्हते. खरंतर अजून काही वेळ बसायला हवं होतं, पण त्या सगळ्याच वातावरणाचा कंटाळा आला होता. किळस आल्यासारखी झाली होती. शैलजानं कागद आवरले आणि ती बाहेर पडली. नेहमी तिच्याबरोबर सरिता तरी असेच. ऑफिसमधून स्टेशन, लोकलची गर्दी, खच्चून भरलेला फलाट, घामाचा वास, दीड तासाचा प्रवास... आणि मग घर!... सप्त समुद्र पार करून जाण्यापैकी तो प्रकार होता. सरिता असली की तेवढंच बरं वाटे. गप्पागोष्टी करता येत. मन मोकळं होई. दुसर्याा दिवसाशी सामना करायला पुन्हा धीर येई.
सरिता आज नव्हतीच. काहीतरी कारण सांगून तिनं येण्याचं टाळलं होतं. कारण खरं नव्हतं ते शैलजाला माहीत होतं. आपल्याला वाईट वाटेल म्हणून ती चुकवत आहे, खरं सांगत नाही, हे तिनं ओळखलं होतं.
ऑफिसच्या कॉरिडॉरमधून ती बाहेर पडली. गर्दीचं तुफान सुरू झालं होतं. सेक्शनमधल्या मुली कुणा-कुणाबरोबर हसत-खिदळत चालल्या होत्या. कुणी हॉटेलात जाणार होत्या, रात्रीच्या शो बघण्याचे कुणाचे विचार होते. कुणाचं काही, कुणाचं काही. प्रत्येकीबरोबर कुणीतरी पुरुष होता. प्रत्येक जण कुणातरी परपुरुषाला हवीशी वाटत होती. सरिता त्यांतच असणार... कुठल्या तरी हॉटेलमध्ये! कोपऱ्याचवरच्या अंधारात कुणाशी तरी लगटून चाललेली. सूचक शृंगारिक बोलणारी! तशा त्या बोलण्याची मजा शैलजानं कधी घेतलीच नव्हती. वरवर सरळ वाक्यं, पण आत शृंगाराचं, बिभत्सतेचं अस्तर! तिला तसा कुणी अनुभव दिलाच नव्हता. सरितेला तरी तसं सर्व काही मिळालं असेल का?... कुणास ठाऊक.
सप्त समुद्र ओलांडून ती घरी पोचली, तेव्हा अंधार दाटला होता. दिवे लागले होते. कुणाशी काहीही न बोलता, डोक्यावरून पांघरूण घेऊन स्वस्थ पडून राहावं, असं तिला वाटत होतं.
सशुल्क कथा
रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा व कथेचा मनमुराद आनंद घ्या!
नर / श्री. ज. जोशी
₹25.00 ₹10.00