धुमारे / ज्ञानेश्वर नाडकर्णी / मेनका / दिवाळी १९७५
कॉलनीच्या पटांगणात बॅडमिन्टनचा खेळ चाललेला होता आणि गॅलरीच्या कठड्याला रेलून माधवराव तो पाहत होते.
खरं म्हणजे जरी त्यांची नजर केळाकडे लागलेली होती, तरी त्यांचं लक्ष काही पूर्णपणे तिथे नव्हतं.
बॅडमिन्टनचं पांढरं फूल नेटवरून एकदा या बाजूनं, तर एकदा त्या बाजूनं हवेत झेपावत होतं. चांगला शॉट साधला, तर तो मारणार्या खेळाडूला स्वतःच हवेत उंच झेपावल्यासारखं वाटे. आणि माधवरावांचं त्या वेळेला खेळाकडे लक्ष असलंच, तर त्यांनासुद्धा आपल्याच हातात ती पराक्रमी रॅकेट असल्याचा भास होई.
माधवरावांची मुलगी मेधा खेळत होती. कॉलनीतली तिची मैत्रीण नेटच्या पलीकडे होती. एखादा शॉट चुकला आणि अपेक्षेपेक्षा वेगळ्याच दिशेनं गेला, तर दोघीजणी हसत खिदळत, अन् ते ऐकताना त्या दोन्ही मुली आपल्यापेक्षा खूप दूर असलेल्या अशा जगात वावरत आहेत, असं माधवरावांना वाटे.
त्या दोन्ही मुलींनी बेल बॉटम स्टाईलच्या विजारी घातल्या होत्या. अलीकडे पाहावं तिथे हीच फॅशन रूढ झालेली होती. आपल्या ऑफिसातल्या एका सहकार्याबरोबर माधवराव दुपारचे एकदा जवळच्या एका फॅशनेबल रेस्टोरंटमध्ये गेले होते. तेव्हा टोळधाड यावी तसा पलीकडच्या कॉलेजातल्या मुला-मुलींचा एक गट त्या उपाहारगृहात घुसला.
‘‘अलीकडे या वेषातली ही मुलं-मुली बघितली, की माझं डोकं उठतं!’’
माधवराव आपल्या सहकार्याला म्हणाले.
‘‘अरे, असं म्हणून कसं चालेल?’’ त्यांचा सहकारी म्हणाला, ‘‘तू जरा सोशिक व्हायला शिकलं पाहिजे. हा दोन पिढ्यांमधला फरक आहे. हे विद्यार्थी असे कपडे करणारच!’’
‘‘त्या कपड्यांच्या जोडीला ते फॅशनेबल इंग्रजी उच्चार!’’ माधवराव म्हणाले, ‘‘तू म्हणतोस तेच खरं आहे. हा दोन पिढ्यांमधला फरक आहे, पण आम्ही यांच्या वयाचे होतो तेव्हा...’’
‘‘तेव्हाही तसा फरक होताच,’’ सहकारी म्हणाला, ‘‘तुला आज जसे हे पोषाख नजरेत खुपताहेत तसे त्या काळी...’
सशुल्क कथा
रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा व कथेचा मनमुराद आनंद घ्या!
धुमारे / ज्ञानेश्वर नाडकर्णी
₹25.00 ₹10.00