Now Reading
ठेव / शशी पटवर्धन / मेनका / जानेवारी १९६५

ठेव / शशी पटवर्धन / मेनका / जानेवारी १९६५

‘‘तुम्ही लग्न का करत नाही?’’ माहेरवाशीण म्हणून आलेल्या मुलीनं भाऊंना अचानक विचारलं. तशी तासलेल्या डोक्यावर घसाघसा हात घाशीत तिच्याकडे ते पाहू लागले. त्यांचा धाकटा मुलगा दोन्ही हातांत जानवं घेऊन मागेपुढे करत होता. नुकतीच त्याची मुंज झाली होती. बहिणीचा प्रश्नी ऐकून तोच दचकला. भाऊ मात्र निर्विकार बसले होते. डोक्यावर हात घाशीत.

‘‘होय हो! काय म्हणतेय मी?’’ मांडीवरच्या मुलाला थोपटत पुन्हा ती म्हणाली.

‘‘कशाबद्दल म्हणत्येस?’’

ती चिडली. कपाळाला आठ्या घालत मुलाला जोरानं थोपटू लागली.

‘‘अगो, किती जोरात थोपटतेस?’’ ते म्हणाले, ‘‘माझ्यावरचा राग त्याच्यावर कशाला काढतेस?’’

‘‘सासरी सारखे डिवचताहेत त्याची काय वाट?’’

‘‘कशाबद्दल?’’ साध्या आवाजात पुन्हा म्हणाले.

‘‘जसं काही तुम्हाला माहीतच नाही.’’

‘‘माझ्यामुळे तुला त्रास होतो ना? मग बघतेसच कशाला माझ्याकडे?’’

ती अवाक् झाली. मांडीवरच्या मुलाला खांद्यावर घेऊन उठली. उजवीकडच्या खोलीत गेली.

भिंतीला डोकं टेकवून, डोळे मिटून ते बसले. तेवढ्यात त्यांचा धाकटा मुलगा मांजरासारखा त्यांना सामोरा आला. त्याची मांजराची चाहूल मात्र त्यांच्या लक्षात आली. तशी दचकून त्यांनी मान पुढे झुकवली. त्याच्याकडे पाहत विचारलं,

See Also

‘‘शाळेत नाही का गेलास?’’

‘‘नाही.’’ खालच्या मानेनं मुलगा म्हणाला.

‘‘ताई काय बोलली ते ऐकलंस की काय तू?’’ काहीशा संशयानं त्याला विचारलं.

क्षणभर मुलगा बोलला नाही.

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.