Now Reading
जगावेगळा / रमेश ललगूणकर / मेनका / ऑगस्ट १९७१

जगावेगळा / रमेश ललगूणकर / मेनका / ऑगस्ट १९७१

शंकर माझा मित्र आणि सदानंद शंकरचा मित्र. म्हणजे माझ्या मित्राचा मित्र. त्यामुळे सदानंदाची आणि माझी तशी ओळख होती. आणि म्हटलं तर तशी नव्हतीही. तो माझ्या घरी कधी आला नव्हता आणि त्यानंही कधी त्याच्या घरी बोलावलं नव्हतं. कधीतरी रस्त्यावर भेट झाली, तर तात्पुरतं बोलणं उरकूनच त्या भेटीची सांगता व्हायची. त्याच्याबद्दल उत्सुकता वाटावी असं त्याच्यात काही आहे, असं मला कधी वाटत नाही. त्याचं शिक्षण प्राथमिक अवस्थेतच संपलं होतं, हेही मला शंकरकडून कळलं होतं. त्याला आई-वडील कुणी नव्हतं आणि एका दूरच्या मामीच्या घरी त्यानं सध्या तळ ठोकला होता. बस्स! जेमतेम इतकीच माहिती शंकरनं मला दिली होती. सदानंदबद्दल एखाददुसरं वाक्य तो कधीतरी बोलायचा. त्याचं रूपही चारचौघांसारखं सामान्यच होतं, नाही म्हणायला त्याचे डोळे विलक्षण बोलके होते. भरल्या मेघासारखे ते दिसायचे. तो हसला, की त्यातून भावधारा वाहू लागतील की काय असं वाटायचं, पण ते तेवढ्यापुरतंच. मग मी त्याला विसरून जायचो ते त्याची माझी पुन्हा भेट होईपर्यंत.

पण दैवगती वेगळी होती. माझा त्याच्याशी नेहमीसाठी संबंध जोडावा असं दैवाच्या मनात आलं असावं. म्हणूनच तो एका दुपारी माझ्या घरी आला.

मी आरामखुर्चीत बसून दुकानाचे हिशेब मनात जुळवत होतो. बाहेर ऊन रणरणत होतं. सावल्या पेंगुळल्या होत्या. माझ्या डोळ्यांवरही हिशेबाचे आकडे जुळून येऊन पापण्या जड करू लागले होते.

एवढ्यात फाटक वाजलं आणि शंकर सदानंद माझ्यापुढे येऊन उभे राहिले. माझी झोप खाडकन् उतरली. क्षणभर सदानंद माझ्याकडे आला आहे याचं भानच आलं नाही.

See Also

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.