कातरवेळ / मधु मंगेश कर्णिक / मेनका / जानेवारी १९६२
पाऊस पडत होता. तारेवर एक बोजड कावळा तोल सावरण्याची खटपट करत होता. त्याला धड बसता येत नव्हतं, उडता येत नव्हतं. कातरवेळ झाली होती, पण अंधार अजून दाट झाला नव्हता. शाली घरात शिरली. इतका वेळ गॅलरीतल्या दरवाजावर पाय तिरपा धरून उभं राहण्याचा तिला कंटाळा आला होता. नुसतंच बाहेर पाहत उभं राहायचं. तो येतो का, याची वाट बघत. त्यानं दिलेली वेळ व्हायला अद्याप अवकाश होता, पण शालीला सारखं वाटत होतं, झाली खुणेची वेळ... आत्ता रिक्षा येईल. फर्रफर्र करत पलीकडल्या वळणावर उभी राहील... पिशवी अजून भरायची आहे. कपडे सगळे गोळा करायचेत. कपडे आहेतच किती? परकर, पोलकी नि एकुलतं एक निळं पातळ... नुसत्या परकरावरच बाहेर पडावं, की मामांच्या गादीखाली घडीला ठेवलेलं पातळही बरोबर घ्यावं? मामा विचारतील ‘या वेळी पातळ कशाला म्हणून...’ विचारू देत! सांगू- ‘तुमच्या औषधासाठी मध आणायला बाजारात जाऊन येते म्हणून.’ ‘पण इथे वाण्याकडे जायचं, तर पातळ कशाला हवं?’ पण तुम्हीच नाही का त्या दिवशी म्हणालात- ‘आता तू नुसत्या परकर-पोलक्यात बाहेर हिंडू नकोस म्हणून...’
शाली घरात शिरली नि तिनं हलकेच मामांच्या कॉटकडे नजर टाकली. चादर पांघरून मामा स्वस्थ पडले होते. झोपले होते का? त्यांना सुस्त झोप कशी ती लागतच नाही... सारखं आपले जागे असतात. पडून पडून माझ्यावर पाळत ठेवतात. ‘शाली, कुठे चाललीस? शाली, काय करतेस? शाली, कोण आलं होतं? शाली, शाली, शाली...’
शाली खोलीत शिरल्याची जाग लागताच कॉटवरून क्षीण हाक आली- ‘‘शालीऽ-’’
‘‘आले मामा.’’
‘‘इकडे ये.’’
इकडे ये कशाला? बरी आहे इथे दूर आहे तीच. इथून मला सगळं नीट ऐकू येतं.
‘‘काय मामा?’’
‘‘अशी जवळ ये.’’
सशुल्क कथा
रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा व कथेचा मनमुराद आनंद घ्या!
कातरवेळ / मधु मंगेश कर्णिक
₹25.00 ₹10.00