एक प्रेमकथा, आणि दुसरी?? / मनोरमा बापट / मेनका / जुलै १९९१
ऐन बहरात आलेलं गहिरं तारुण्य! केवड्याची अंगकांती, पिंगट पिंगट असं दोनदा म्हणावंसं वाटावं इतके पिंगट, लांबट डोळे. छोटंसं उपरं नाक. सायीचे गाल, ओठ तर गुलाब पाकळ्याच!
असं हे मूर्तिमंत लावण्य रसिक, उमद्या स्वभावाच्या देखण्या, बलदंड, तरुण मुकुंदाच्या दृष्टीस पडलं. एका लग्नाच्या मांडवात. मित्राच्या लग्नाला तो कोकणातल्या या गावी आलाय. मांडवात मंगलाष्टकं सुरू आहेत आणि ही लावण्यलतिका बायकांच्या घोळक्यात उभी आहे. डाव्या हाताच्या तळव्यातल्या अक्षता उजव्या चिमटीनं उधळतेय वधू-वरांच्या दिशेनं! भटजी आपल्या ‘खास’ सुरात मंगलाष्टकं म्हणताहेत. मधूनच एखादी मंगलाष्टक बायका किनऱ्या आवाजात म्हणताहेत. मुकुंदाच्या हातातसुद्धा अक्षता आहेत, पण जशान् तश्शा त्यानं त्या धरल्या आहेत. त्याचं ध्यान असं काही त्या रूपमतीकडे लागलंय, की बाकी कशाचं भानच नाहीये. ‘तदेव लग्नम्...’ संपलं, ‘शुभ मंगल सावधान’ची ललकारी झाली, वाजंत्री वाजली आणि त्या आवाजानं तो भानावर आला. हातातल्या अक्षदा एकदमच त्यानं उधळून टाकल्या.
इतका वेळ भोवती स्तब्ध उभी असलेली गर्दी एकदम ‘हलू’ लागली आणि त्या हलत्या गर्दीत ती रूपगर्विता एकदम दृष्टीआड झाली.
मुकुंदाची नजर कावरीबावरी होऊन भिरीभिरी तिचा वेध घेऊ लागली. अस्वस्थपणे तो मांडवात फिरू लागला. हाताच्या मुठी वळू लागल्या, उघडू लागल्या. कुणीतरी त्याच्या हाती दिलेल्या केशरी पेढ्याचा पार चुरा होऊन गेलाय!
अचानक त्याच्या शोधक डोळ्यांनी तिला टिपली. बायकांमध्ये ती अत्तर लावतेय. हिरवी साडी नेसलीय. साऱ्या वनराईचा रंग जणू शोषून घेतलायसं वाटावं इतका रंग हिरवा आहे. सोनचाफ्याचा रंग आणि सुवर्णाची चमक असलेली निमुळती अशी साडीला किनार आहे. तिच्या गळ्यात टपोऱ्या व, तांबूस, अस्सल मोत्यांचा सर आहे आणि कानांमध्ये तशाच मोत्यांची चांदणी! अत्तर लावता लावता ती मधूनच खुदकन हसली आणि तिच्या गालात एक खट्याळ खळी उमटली. मुकुंदाचा जीव खळीत अडकलाच. ‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला!’ मोह झाला. धावत सुटावं, त्या बायकांच्या घोळक्यात घुसावं, अत्तरासाठी आपला पालथा पंजा तिच्यापुढे धरावा. तिचा दुरावा सहनच होईना. त्याचा जीव मुळी पाण्यातून काढलेल्या मासोळीचाच झाला!
सशुल्क कथा
रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा व कथेचा मनमुराद आनंद घ्या!
एक प्रेमकथा, आणि दुसरी?? / मनोरमा बापट
₹25.00 ₹10.00