Subscriptions
ऑनलाईन वर्गणी भरणाऱ्यांसाठी विशेष सूचना:
- ‘मेनका’ व ‘माहेर’ या मासिकांची एकूण अकरा (दहा+दिवाळी अंकासह) अंकांची आंतरदेशीय (स्थानिक) वर्गणी प्रत्येकी रु. ३०९/- (तीनशे नऊ रुपये) आणि परदेशसाठी रु. १७५१/- (सतराशे एक्कावन्न रुपये) आहे. दिवाळी अंक रजिस्टर्ड बुक-पोस्टाने पाठवले जातात.
- वरील दर हे ऑनलाईन वर्गणी भरणाऱ्यांसाठीचे दर आहेत. वर्गणीची रक्कम मनीऑर्डर, अॅट पार चेक अथवा डिमांड ड्राफ्टनेही पाठवता येईल. या माध्यमांद्वारे वर्गणी भरल्यास ‘मेनका’ व ‘माहेर’ साठी प्रत्येकी रु. ३००/- (तीनशे रुपये) (आंतरदेशीय) आणि प्रत्येकी रु. १७००/- (सतराशे रुपये) (परदेश) अशी वर्गणी भरावी. मनीऑर्डर, चेक किंवा डिमांड ड्राफ्ट ‘व्यवस्थापक, मेनका प्रकाशन, २११७, सदाशिव पेठ, विजयानगर कॉलनी, पुणे ४११०३०’ या पत्त्यावर पाठवावा. मनीऑर्डरच्या संदेश कूपनवर आपले संपूर्ण नाव, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, पिनकोड नंबर तसेच वर्गणी कोणत्या नियतकालिकासाठी पाठवली आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा. चेक अथवा ड्राफ्ट ‘मेनका प्रकाशन’ (MENAKA PRAKASHAN) या नावानेच काढावा.
- सध्याच्या वर्गणीदारांनी आपला वर्गणीक्रमांक अवश्य लिहावा. कार्यालयात समक्षही वर्गणी स्वीकारली जाईल.
- वार्षिक वर्गणीची रक्कम आम्हाला मिळताच त्याची पोच देणारी व आपली वर्गणीदार क्रमांक कळविणारी पावती आमच्या कार्यालयातून पाठविली जाते.
- वर्गणीदारांचे अंक काळजीपूर्वक पूर्ण पत्त्यासह काळजीपूर्वक तपासून, मोजून कटाक्षाने पोस्टात समक्ष दिले जातात. अंक गहाळ झाल्यास दुसरी प्रत पाठविण्याचा आमचा प्रयत्न असतोच.
- कोणत्याही महिन्यापासून वर्गणीदार होता येते.
- वर्गणीसंदर्भातील अधिक माहितीसाठी ०२०-२४३३६९६० किंवा ०९८२३ ६९ ६९ ६० या क्रमांकावर संपर्क साधावा.

