कातरवेळ / मधु मंगेश कर्णिक

25.00 10.00

Category:

Description

पाऊस पडत होता. तारेवर एक बोजड कावळा तोल सावरण्याची खटपट करत होता. त्याला धड बसता येत नव्हतं, उडता येत नव्हतं. कातरवेळ झाली होती, पण अंधार अजून दाट झाला नव्हता. शाली घरात शिरली. इतका वेळ गॅलरीतल्या दरवाजावर पाय तिरपा धरून उभं राहण्याचा तिला कंटाळा आला होता. नुसतंच बाहेर पाहत उभं राहायचं. तो येतो का, याची वाट बघत. त्यानं दिलेली वेळ व्हायला अद्याप अवकाश होता, पण शालीला सारखं वाटत होतं, झाली खुणेची वेळ… आत्ता रिक्षा येईल. फर्रफर्र करत पलीकडल्या वळणावर उभी राहील… पिशवी अजून भरायची आहे. कपडे सगळे गोळा करायचेत. कपडे आहेतच किती? परकर, पोलकी नि एकुलतं एक निळं पातळ… नुसत्या परकरावरच बाहेर पडावं, की मामांच्या गादीखाली घडीला ठेवलेलं पातळही बरोबर घ्यावं? मामा विचारतील ‘या वेळी पातळ कशाला म्हणून…’ विचारू देत! सांगू- ‘तुमच्या औषधासाठी मध आणायला बाजारात जाऊन येते म्हणून.’ ‘पण इथे वाण्याकडे जायचं, तर पातळ कशाला हवं?’ पण तुम्हीच नाही का त्या दिवशी म्हणालात- ‘आता तू नुसत्या परकर-पोलक्यात बाहेर हिंडू नकोस म्हणून…’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कातरवेळ / मधु मंगेश कर्णिक”

Your email address will not be published. Required fields are marked *