शृंगार-बळी / राजन रानडे

25.00 10.00

Category:

Description

‘चंद्रदत्त करंबेळकर’ हे माझं नाव नाही. माझं ते नाव असावं, असं मला चुकूनसुद्धा कधी वाटणार नाही. उलट, माझं ते नाव कधीच नसावं, यासाठी मी ईश्वराची करुणा भाकतो.
माझं नाव आहे ‘अजित’ आणि माझ्या बायकोचं नाव आहे ‘अर्चना’. अजित आणि अर्चना! नावंसुद्धा कशी ‘मेड फॉर इच अदर’ वाटतात नाही! पण तसं वाटण्यावाचून दुसरा इलाज तरी काय आहे म्हणा! आता आमचं आडनाव, सॉरी! अशा आडवाटेला आम्ही जात नाही. म्हणजे आम्हाला आमचं आडनाव ठाऊक नाही. चातुर्वर्ण्याचा निषेध करावा, अशा कोणत्या सामाजिक उद्देशानं आम्ही आडनाव सोडलं आहे, अशातला भाग नाही. आम्हाला आमचं आडनाव ठाऊक नाही, याचा अर्थ आम्हाला आडनावच नाही. का नाही ते ‘चंद्रदत्त करंबेळकरा’लाच ठाऊक. आम्हाला एवढंच ठाऊक आहे, की या चंद्रदत्त करंबेळकरामुळे आम्हाला आडनाव नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शृंगार-बळी / राजन रानडे”

Your email address will not be published. Required fields are marked *