वीज / आशा बगे / मेनका / मार्च १९७६

25.00 10.00

केव्हातरी त्या दोघांचीच असलेली गोष्ट आता केवळ त्यांचीच म्हणून राहिली नाही. तरीही एका अनावर पण निर्भय अगतिकतेनं ती फक्त त्यालाच बांधली आहे, हे जेव्हा त्याला अकल्पितपणे कळलं, तेव्हा तो गडबडून गेला.

सन्डे… दादरचा भरलेला वाहता रस्ता… बिल चुकतं करून मि. कर्णिक त्या डिपार्टमेन्टल स्टोअर्सच्या पायर्‍या उतरत होते आणि हाक आली,

 

”कुमार… कुमार… थांब.”

 

या हाकेनं ती संपलेली गोष्ट आपल्याकरता पुन्हा सुरू होईल, असं मि. कर्णिकांना मुळी वाटलंच नाही. फार काय, ती हाक आपल्यासाठीच आहे, हेदेखील त्यांच्या उशिराच ध्यानात आलं.

ती जवळ आली. तिच्या नुसत्या अस्तित्वाचा जो एक परिचित गंध होता, त्यानंच ‘कुमार’चा अर्थ जाणिवेपर्यंत पोचला.

”कुमार! व्हाट ए प्लेझंट सरप्राईज?”

ती अतिशय आनंदली होती. तो भेटल्याचा आनंद शब्दातून, तिच्या सार्‍या हालचालीतून डोकावत होता. निर्भयपणे. त्यात कोणताही ओशाळेपणा नव्हता. जे घडून गेलं त्याच्या काळ्या कडांची पुसटशी किनारही नव्हती. त्यांना मात्र सावरायला, भानावर यायला जरा वेळच लागला. त्यांना तिच्यापुढे थोडं दुबळं, आक्वर्ड आणि असुरक्षित वाटायला लागलं.

”काल मुंबईत पाऊल ठेवल्यापासून ठरवलं होतं तुला भेटायचं. पत्ता वगैरे माहीतच नव्हता. तुझ्या ऑफिसला फोन करणार होते, पण तूच भेटलास. हाऊ नाइस! मिसेस कुमार कुठायत?”

तिनं अपेक्षेनं आजूबाजूला पाहिलं.

पण वीणा गाडीत जाऊन बसली होती आणि मुख्य म्हणजे मि. कर्णिक अजून अ‍ॅडजस्ट झाले नव्हते. ते सारं काही एवढं जुनं नव्हतं तरीही…

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वीज / आशा बगे / मेनका / मार्च १९७६”

Your email address will not be published. Required fields are marked *