लॉटरी / नंदिनी नाडकर्णी

25.00 10.00

Category:

Description

सकाळचा सहाचा गजर वाजतो न वाजतो तोच विश्वनाथनं हात लांब करून टेबलावरच्या घड्याळाचा तो गजर थांबवला आणि अंथरुणावरून उठताना रोज येणारा विचार आजही त्याच्या मनात आला, ‘वयाच्या तेराव्या वर्षापासून मी पहाटे पाच वाजता उठतो, पण आज वयाची पासष्टी उलटली तरी आपण होऊन जाग कशी ती येत नाही. आता घड्याळ लागतं, पूर्वी आई उठवायची.’
आईची आलेली आठवण मनातून बाजूला सारून विश्वनाथ उठला आणि रोजच्या क्रमानुसार स्वत:ची सारी कामं उरकून त्यानं गॅसवरचा चहा खाली उतरवला. चहा गाळत असताना पेपरवाल्यानं बाहेरच्या कडीला पेपर अडकवल्याचा आवाज त्यानं ऐकला. हेही रोजच्याप्रमाणेच! हातात चहाचा कप घेऊन त्यानं दरवाजा उघडून जमिनीवरचा टाइम्स उचलला. फिरायला जाण्यापूर्वी फक्त हेडलाइन्सवर नजर टाकायची, ही त्याची रोजची सवय. फिरून परतताना दूध आणायचं आणि मग ताज्या दुधाचा चहा पिताना टाइम्स सविस्तर वाचायचा. रोजच्या या सवयीनुसार त्यानं हेडलाइन्सवर नजर टाकली व दुसरं पान उलटलं. डेथ कॉलममध्ये अगदी ठळक अक्षरात लिहिलं होतं, ‘चितळे’. त्याचंच आडनाव! कोण बुवा गेलं? आपल्या नात्यातलं तर कुणी नाही ना, असं मनाशी म्हणत त्यानं ट्यूबलाइट लावली व संपूर्ण बातमी वाचली.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लॉटरी / नंदिनी नाडकर्णी”

Your email address will not be published. Required fields are marked *