मेहुणी म्हणजे… / चंद्रकांत द. पै

25.00 10.00

Category:

Description

आज सकाळपासून आमच्या सुषमाबाई आनंदात मश्गुल आहेत. त्यांच्या एकुलत्या एका भावाचं लग्न ठरलं म्हणून नव्हे, तर त्या निमित्तानं आईकडे मनमुराद पंधरा दिवस चरायला मिळणार म्हणून! आपल्या आईचं इतकं वेड असणारी दुसरी मुलगी मी पाहिली नव्हती. बेळगावला माहेरी जायचं ठरलं, की कशात लक्ष लागायचं नाही तिचं. सारखं हे राहिलं ते राहिलं. तिला माहेरी जाण्यासाठी किंवा तिथे मन:पूत राहण्यासाठी मी कधी मना केलं नव्हतं. तरीसुद्धा ती इतकी हरखून जावी, याचं मला कधीकधी वाईटही वाटत असे. लग्न झाल्यानंतर मुली नवर्याेबरोबर रंगून जातात, असं मी ऐकलं होतं; पण हिचं मात्र जगावेगळं. खरं म्हणजे सासुरवाडीला राहायला मलाही आवडे. माझं तिथे फार कौतुक होई. सासू-सासरे फार लाड करत. चढवून ठेवत, पण हवी तितकी रजा न मिळाल्याकारणानं मला फारसं राहता येत नसे. आता मात्र…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मेहुणी म्हणजे… / चंद्रकांत द. पै”

Your email address will not be published. Required fields are marked *