प्रेमभंग / चंद्रकांत पै

25.00 10.00

आपण काही सांगितलं, तरी लोक समजायचं ते समजतात. नाहीतरी माणूस हल्ली इतकं खोटं बोलायला लागलाय, की खरं सांगितलं, तरी ऐकणारा त्याच्या उलटच ऐकतो. म्हणून मी ठरवलंय, की खरं तेच सांगायचं. शैलाविषयी कुणीही मला विचारलं म्हणजे मी सरळ सांगतो,

‘माझा प्रेमभंग झालाय!’

खरंच शैलानं मला अव्हेरलं. पण तसं न सांगता, ‘ती वाईट आहे. माझं तिचं पटणार नाही म्हणून मी हल्ली तिच्याकडे जात नाही’, असं जर कुणाला सांगितलं असतं, तर लोक म्हणाले असते, ‘शैलानं याला डावललं हं!’ आता लोकांना वाटतं, वाटतं काय, माझ्या तोंडावरसुद्धा काहीजण म्हणतात,

‘पोरी फिरवायला हव्यात यांना, पण लग्न करायला नको.’

एकवेळ असं म्हटलेलं परवडलं, पण एका पोरीकडून प्रेमभंग झाला असं लोकांनी म्हणू नये, असं मला वाटतं, म्हणून मी आपणहूनच आपला सांगतो,

‘माझा प्रेमभंग झालाय.’

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रेमभंग / चंद्रकांत पै”

Your email address will not be published. Required fields are marked *