जगावेगळा / रमेश ललगूणकर

25.00 10.00

Category:

Description

शंकर माझा मित्र आणि सदानंद शंकरचा मित्र. म्हणजे माझ्या मित्राचा मित्र. त्यामुळे सदानंदाची आणि माझी तशी ओळख होती. आणि म्हटलं तर तशी नव्हतीही. तो माझ्या घरी कधी आला नव्हता आणि त्यानंही कधी त्याच्या घरी बोलावलं नव्हतं. कधीतरी रस्त्यावर भेट झाली, तर तात्पुरतं बोलणं उरकूनच त्या भेटीची सांगता व्हायची. त्याच्याबद्दल उत्सुकता वाटावी असं त्याच्यात काही आहे, असं मला कधी वाटत नाही. त्याचं शिक्षण प्राथमिक अवस्थेतच संपलं होतं, हेही मला शंकरकडून कळलं होतं. त्याला आई-वडील कुणी नव्हतं आणि एका दूरच्या मामीच्या घरी त्यानं सध्या तळ ठोकला होता. बस्स! जेमतेम इतकीच माहिती शंकरनं मला दिली होती. सदानंदबद्दल एखाददुसरं वाक्य तो कधीतरी बोलायचा. त्याचं रूपही चारचौघांसारखं सामान्यच होतं, नाही म्हणायला त्याचे डोळे विलक्षण बोलके होते. भरल्या मेघासारखे ते दिसायचे. तो हसला, की त्यातून भावधारा वाहू लागतील की काय असं वाटायचं, पण ते तेवढ्यापुरतंच. मग मी त्याला विसरून जायचो ते त्याची माझी पुन्हा भेट होईपर्यंत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जगावेगळा / रमेश ललगूणकर”

Your email address will not be published. Required fields are marked *