कल्याण / अॅ्ड. देविका साने

25.00 10.00

Category:

Description

‘‘आवारातच कार लाव’’ उतरता उतरता सुचित्रानं ड्रायव्हरला बजावलं. ‘‘आणि हे बघ, मला सी. एम. साहेबांकडे ताससुद्धा लागेल. पण तू कार लावून पानपट्टीच्या दुकानावर जाऊ नकोस.’’
‘‘बरं बाई.’’
मंत्रालयातला लिफ्टमन सुचित्राकडे पाहून कळत नकळत हसला. इतरांना त्यानं उर्मटपणानंच कितव्या मजल्यावर जायचंय, असं विचारलं. सुचित्राला सी. एम. साहेबांच्या मजल्यावर जायचं असतं, हे त्याला ठाऊक होतं.
सी. एम.च्या मजल्यावर नेहमीसारखीच गर्दी होती. काही लोक घोळका करून, तर काही काखेत फायली घेऊन एकेकटे उभे होते.
पांढर्याक कपड्यांतले, पान चघळणारे आणि तंबाखू मळणारे आमदार व्ही. आय. पी. वेटिंग रूममध्ये जागा अडवून बसले होते.
लिफ्टमधून उतरताना सुचित्रानं लिफ्टमधल्या आरशात झटकन नजर टाकली. सकाळीच ती पार्लरमध्ये जाऊन केस सेट करून आली होती. हेअर स्प्रे मारल्यामुळे केस अगदी जाग्यावर आणि ठीकठाक होते. डाव्या हाताच्या करंगळीनं तिनं आपली केसांची बट कपाळावर आणखीनच खेचली.
एकदा बोलता बोलता सी. एम. तिला म्हणाले होते, की गुलाबी रंग सुचित्राच्या गोर्याी रंगाला खूप उठून दिसतोय आणि त्यामुळे आज लक्षात ठेवून ती गुलाबी, चंदेरी साडी नेसली होती. चंदेरी साडीच्या एकेरी पदरातून तिचं गुलाबी कटोरी ब्लाऊज जरा अधिकच स्पष्ट दिसत होतं. त्यातल्या गोलाईसह! समोरून तर ब्लाऊजचा गळा जरा खोल होताच, पण मागच्या बाजूनं तर जास्तच खोल होता. सुचित्रानं मुद्दामच दोन्ही खांद्यांवरून पदर लपेटून घेतला होता, पण मुळात पदर पारदर्शक आणि एकेरी असल्यामुळे तिच्या पाठीची पन्हळ खोलपर्यंत रुतलेली दिसत होती.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कल्याण / अॅ्ड. देविका साने”

Your email address will not be published. Required fields are marked *