एक प्रेमकथा, आणि दुसरी?? / मनोरमा बापट

25.00 10.00

Category:

Description

ऐन बहरात आलेलं गहिरं तारुण्य! केवड्याची अंगकांती, पिंगट पिंगट असं दोनदा म्हणावंसं वाटावं इतके पिंगट, लांबट डोळे. छोटंसं उपरं नाक. सायीचे गाल, ओठ तर गुलाब पाकळ्याच!
असं हे मूर्तिमंत लावण्य रसिक, उमद्या स्वभावाच्या देखण्या, बलदंड, तरुण मुकुंदाच्या दृष्टीस पडलं. एका लग्नाच्या मांडवात. मित्राच्या लग्नाला तो कोकणातल्या या गावी आलाय. मांडवात मंगलाष्टकं सुरू आहेत आणि ही लावण्यलतिका बायकांच्या घोळक्यात उभी आहे. डाव्या हाताच्या तळव्यातल्या अक्षता उजव्या चिमटीनं उधळतेय वधू-वरांच्या दिशेनं! भटजी आपल्या ‘खास’ सुरात मंगलाष्टकं म्हणताहेत. मधूनच एखादी मंगलाष्टक बायका किनर्यां आवाजात म्हणताहेत. मुकुंदाच्या हातातसुद्धा अक्षता आहेत, पण जशान् तश्शा त्यानं त्या धरल्या आहेत. त्याचं ध्यान असं काही त्या रूपमतीकडे लागलंय, की बाकी कशाचं भानच नाहीये. ‘तदेव लग्नम्…’ संपलं, ‘शुभ मंगल सावधान’ची ललकारी झाली, वाजंत्री वाजली आणि त्या आवाजानं तो भानावर आला. हातातल्या अक्षदा एकदमच त्यानं उधळून टाकल्या.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एक प्रेमकथा, आणि दुसरी?? / मनोरमा बापट”

Your email address will not be published. Required fields are marked *