एक पूर येऊन गेला / ग. वा. बेहेरे

25.00 10.00

फोटोसाठी आम्ही सर्वजण उभे राहिलो. मग आपापल्या मानाप्रमाणे खुर्च्यांवरही बसलो. काहीजण मागे उभे राहिले. फोटोग्राफरच्या सूचनेप्रमाणे जवळअधिक, उंचठेंगू, असे क्रमही बदलण्यात आले. फोटोग्राफरच्या चेंगटपणामुळे आणि अतिरेकी सूचनांमुळे उकाड्याचा त्रास वाढत होता. मला तर केव्हा हा तमाशा संपतोय असं झालं होतं. परंतु काही सामाजिक उपचार असे असतात, की जेथे मनाविरुद्ध गोष्टी घडत असूनही हसतमुख चेहरा घेऊन वावरावं लागतं. या मंडळात कथाकथनासाठी मी आलो होतो. त्या मंडळाचा कसलासा उत्सव होता. आणि त्यानिमित्त हा फोटो होता हे उघड होतं. पण इतका वेळ त्यासाठी ताटकळायला लावणं आणि उघड्या हवेतउतरत्या उन्हात का होईनाबसायला लावणं ही खरोखरच एक शिक्षा होती. कथाकथनासाठी म्हणून मी केलेला जामानिमा चांगलाच बिघडला होता. अंग घामेजलं होतं. त्या जुनाट फोटोग्राफरनं फोटो निघाल्याचं एकदा जाहीर केलं, तेव्हा हुश्श म्हणून मी उभा राहिलो. मी उभा राहताच एका सुगंधाच्या दिशेनं मी पाहिलं, तो ती मागे दिसली.

तिचं तेच खर्‍या अर्थानं पहिलं दर्शन. तशी तिला मी जाता येता,
सभासंमेलनात अधूनमधून पाहिली होती, नाही असं नाही. पण इतक्या निकट एकमेकांसमोर अशी ती आमची पहिलीच भेट. तिचा बांधा लहान होता. अंगानं ती पुष्ट होती आणि वर्णानंही गव्हाळ होती. तिचे केस तोकडे होते. आणि ते तिनं एका फितीनं बांधले होते. फक्त तिच्या डोळ्यांत एक विलक्षण उदास तृष्णा होती. ती एक बर्‍यापैकी उदयोन्मुख लेखिका होती, पण गाठभेट होऊन ओळख होण्याचा योग आला नव्हता.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एक पूर येऊन गेला / ग. वा. बेहेरे”

Your email address will not be published. Required fields are marked *