आम्ही दोघी / शं. ना. नवरे

25.00 10.00

माझा तर उपासच होता. यमीची पोटाची तक्रार. भाताचे चार उंडे गिळून ती पडली होती. पडली होती कसली? सारखी बडबडत होती, शिव्या घालत होती. पोटाला आणि आपल्या पोटच्या पोरालागंप्याला!

‘‘…बघीन बघीन नायतर विळीवर हे पोट चिरूनच टाकीन.’’

‘‘हा गधडा पस्तिशीला आला. दिडकी कमावत नाय. निस्ता फुकटचं गिळतो. आज्यानं ठेवलीये जमीन म्हणून बरं, नायतर भीकच मागत फिरला असतापोरगी देणार कोण या म्हसोबाला?’’

‘‘…दोन टायमाला भात खाऊन खाऊन तडतडतंय मेलं.’’

‘‘…आयशीला मच्छी आवडती, पण कदी मच्छी आणायचा नाय कारटा. सोताला मिळत असंल कानूच्या हाटेलात. कानू फुकाटचं नाय पुढ्यात ठेवीत. ही एवढी भांडी घासून घेतो गंप्याकडून.’’

मी माळ ओढत होते आणि यमीचं बोलणं ऐकत होते. यमीला माहीत आहे माझी सवय. आणि देवानं आमचं काय चांगलं केलंय, म्हणून मनापास्नं माळ ओढायची? तर यमी बडबडतानाच मला म्हणाली, ‘‘गौरे, तूच सांग, हा पस्तिशीचा घोडा. यानं आपल्याला म्हातार्‍यांना सांभाळायचं का आपण याला सांभाळायचं?’’

मी काहीच बोलले नाही. मनात मात्र हसले. हसले आणि पुन्हा हसले. देवाच्या नावानं माळ ओढता ओढता मधेचभानूभानूभानूअसं ओठांवर आलं.

‘‘गौरे, तुला भानू आठवतो?’’

म्हणून तर पयल्यांदा मी हसले होते. हातातली माळ विसरून खोटंच बोलले, ‘‘कोण गं?’’

‘‘भानू आठवत नाय तुला, रांडे? तेव्हा तर वेडी झाली होतीस त्याच्यावर! त्यानं निस्ता हात फुडं केला असता, तर जाऊन झोपली असतीस त्याच्या पुढ्यात.’’

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आम्ही दोघी / शं. ना. नवरे”

Your email address will not be published. Required fields are marked *