Menaka
सई ताम्हनकरशी दिलखुलास गप्पा, योगासनं, स्लिमींग, स्पा आणि बरेच काही – जूनच्या हेल्थ अॅंड फिटनेस विशेषांकामध्ये!
मेनका म्हणजे मराठी मासिकविश्वाला वेगळे वळण देणारे मासिक. मोकळेपणाने श्वास घेऊ लागलेल्या मराठी समाजाची अभिव्यक्ती प्रथम ‘मेनका’तून प्रतिबिंबित होऊ लागली. समाजात कालानुरूप होत असलेले बदल सहजपणे ‘मेनका’मध्ये पडतात, त्या अर्थाने ‘मेनका’ हे समाजाचे बोट धरून चालणारे मासिक आहे. साहस आणि शृंगार हा या मासिकाचा आत्मा आहे. साहस म्हणजे अंधारात उडी घेणे नव्हे आणि शृंगार म्हणजे फक्त दोन शरीरांचा खेळ नव्हे. प्रत्येक स्थितीला धीट मनाने सामोरे जाण्याचे बळ अंगी बाणवणे यात साहस दडलेले आहे आणि रसिकता जपली तर जगणे सुंदर होते, याच्यात शृंगार दडलेला आहे. प्रत्येकाच्या जीवनात असे साहस आणि असा शृंगार असावा अशी आमची भूमिका आहे. ‘मेनका’ मासिकाची यापुढील वाटचालही जीवनातील सौंदर्य आणि साहस टिकविण्याच्या दिशेनेच राहील.
मराठी समाज हा परंपरावादी आहे, पण ते जोखड घेत वागविणारा हा समाज नाही. कारकुनीत अडकलेला समाज यापासून कितीतरी लांबपल्ल्याची झेप मराठी माणसाने घेतलेली आहे. अर्थातच त्यामुळे त्याच्या जगण्याला विविध पैलू निर्माण झालेले आहेत. त्याच्या अनुभवांचा परिघ विस्तारलेला आहे. अनुभवाची समृद्धी बहरलेली आहे. या सार्या समृद्धीला कवेत घेत ‘मेनका’ची वाटचाल सुरू राहील. ती अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी तुमचा हात हवा आहे.
Both comments and pings are currently closed.
