Maher

येऊ देगा पीक पाणी जन्म दुःखाच्या कारणी सोनसळी मातीतला गंध भरुदे आसमानी…

माहेरवाशिणीचे घराघरांत जपले जाणारे माहेरपण साहित्यविश्‍वातून ‘माहेर’ने जपले. गेली ५० वर्षे दर महिन्याला नित्यनेमाने भेटीला येणार्‍या ‘माहेर’ने मराठी स्त्री पृथ्वीतलावर ज्या ज्या ठिकाणी पोचली तिथे जाऊन तिची ‘माहेर’बरोबर असलेली भावना हळुवारपणाने जपली. पन्नाशी पार करीत असताना स्त्रीच्या रोजच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या स्थित्यंतरांची जाणीव ‘माहेर’ जवळून पाहते आहे. गेल्या २५ वर्षांत जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत होत असलेले बदल आणि पुढच्या २५ वर्षांत होणारे बदल, या प्रवासात स्त्रीचे अंगण पार बदलून जाणार आहे.

स्त्रीचे जीवन एका रेषेत चालणारे राहिलेले नाही आणि पुढे त्याच्यात आणखी वळणे प्रत्येक पावलावर असणार आहेत. मूल जन्माला घालण्यासाठीही स्त्रीची आवश्यकता राहणार नाही इथपर्यंत स्त्री अस्तित्वासमोर आव्हाने उभी राहणार आहेत, राहत आहेत. चार-दोन क्षेत्रांत किंवा मामा-मावशी-आत्या-काकांच्या गोतावळ्यांत फिरणारी स्त्री आता सतत वाटचाल करणारी बनली आहे. तिचा कौटुंबिक नव्हे तर सर्व प्रकारचा भवताल बदलतो आहे. या बदलाचे सारे वारे ‘माहेर’च्या अंकांमधून यापुढे दिसू लागतील. मालती बेडेकरांनी ‘विभावरी शिरुरकर’ या नावाने ’कळ्यांचे निःश्‍वास’ या पुस्तकातून स्त्रीचे जगणे मांडले. आता ओझे वाटले तर ते उतरविण्याइतपत खंबीर बनलेल्या स्त्रीच्या जगण्याचे सारे आयाम मांडत ‘माहेर’ आपली वाटचाल करणार आहे. स्त्रीचे भावविश्‍व जपणे आणि स्त्रीच्या कर्तृत्वाला उजाळा देणे अशी ही वाटचाल असेल.

Subscribe to Maher

You can leave a response, or trackback from your own site.

Leave a Reply