HOTS (दहावी) मराठी माध्यम

च्चस्तरीय विचारकौशल्य निर्माण करणार्‍या प्रश्नांवरील (HOTS) एकमेव मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला आनंद होत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित विषयाचे HOTS प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि या विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या शिक्षकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला दरवर्षी ११ लाखांहून अधिक विद्यार्थी बसतात. यंदाच्या परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी उच्चस्तरीय विचारकौशल्य निर्माण करणारे प्रश्न (HOTS) ही संकल्पना समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी नेका सराव करणे आवश्यक आहे. त्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल, अशी आशा वाटते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाला या पुस्तकाची जोड देत अभ्यास केला तर विद्यार्थी यशाकडे नक्कीच मार्गक्रमण करू शकतील.

या पुस्तकाचा मजकूर तज्ज्ञ, कुशल आणि अनुभवी शिक्षकांनी लिहिला आहे. एस.एस.सी. परीक्षेतील HOTS ची सुयोग्य जाण असलेल्या शिक्षकांनी या पुस्तकाद्वारे HOTS ही संकल्पना व्यवस्थित समजावून सांगितली आहे. शिवाय प्रत्येक प्रकरणावरील काही HOTS प्रश्न सोडवून दाखवले आहेत व काही प्रश्न मुलांना सोडवायला दिले आहेत. तुम्ही उज्ज्वल यशासाठी हे पुस्तक नक्की वापरा.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांध्ये उच्चस्तरीय विचारकौशल्ये निर्माण होण्यासाठी सध्या शासनातर्फे काही प्रयत्न होत आहेत. त्याचा एक भाग म्हणून यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणार्‍या एस.एस.सी.च्या परीक्षेतील विज्ञान आणि तंत्रज्ञान व गणित (बीजगणित आणि भूमिती) या विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील २०% प्रश्न उच्चस्तरीय विचारकौशल्यांवर आधारित असतील. शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये अशी कौशल्ये निर्माण व्हावीत, अशी अपेक्षा ’राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५’ या मसुद्यात व्यक्त केली आहे.

HOTSच्या परिपूर्ण तयारीसाठी या वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शकामध्ये तब्बल 500 सोडवलेल्या आणि न सोडवलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे.

Article in Marathi daily Losatta (26th Sept., 2011)
Article in Divya Marathi newspaper

विविध शिक्षणतज्ज्ञांनी शिक्षणविषयक जे सिद्धांत मांडले आहेत, त्यातील बहुतांश सिद्धांत मानवी मेंदूच्या बौद्धिक कार्यावर प्रकाश टाकतात. यापैकी डॉ. बेंझामिन ब्लूम (१९५६) यांचा सिद्धांत शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. २००१ मध्ये डॉ. ब्लूम यांच्या दोन शिष्यांनी या सिद्धांतात भर टाकून बौद्धिक ज्ञान क्षेत्रातील वैचारिक कौशल्यांचे वर्गीकरण केले. यालाच ‘ब्लूमचे सुधारित वर्गीकरण’ असे म्हणतात. हे वर्गीकरण असे आहे -

  • १) स्मरण
  • २) आकलन
  • ३) उपयोजन
  • ४) विश्लेषण
  • ५) मूल्यमापन
  • ६) निर्मिती

वरीलपैकी स्मरण, आकलन व ज्ञानाचे उपयोजन (ज्ञानाचा वापर) या क्षमतांना निम्नस्तरीय विचारकौशल्ये (LOTS – Lower Order Thinking Skills) असे मानतात, तर माहितीचे विश्लेषण, मूल्यमापन व नवनिर्मिती या क्षमतांना उच्चस्तरीय विचारकौशल्ये (HOTS – Higher Order Thinking Skills) असे संबोधले जाते.

The exclusive guide on HOTS for standard X has been published for English medium as well as Marathi medium.
To buy the book, kindly contact your nearest book seller.

To find a book seller near you, please click here.

You can contact us to know more – 020-24336960 or 9823696960 during office hours.

You can also send us an email: sales@menakaprakashan.com

For the Exclusive Guide for HOTS in English Medium, please click here.

Both comments and pings are currently closed.