Now Reading
राणी / चंद्रप्रभा जोगळेकर / मेनका / ऑगस्ट १९६७

राणी / चंद्रप्रभा जोगळेकर / मेनका / ऑगस्ट १९६७

Menaka Prakashan

दिल्लीच्या कॅनॉट प्लेस विभागाचा झगमगाट न्याहाळत मी रेंगाळत चालत होतो. राज कपूरचा गाजलेला चित्रपटजिस देश में गंगा बहती हैपाहण्याच्या इराद्यानं निघालो होतो. थिएटरच्या भिंतींवरची पद्मिनीची उत्तान चित्रं मी जवळपास रोज डोळ्यांखाली घालत होतो. या ना त्या कारणानं हा चित्रपट पाहायचा लांबणीवरच पडला होता. थिएटरमध्ये रेंगाळल्या पायांनी मी आजूबाजूचे फोटो, जाहिराती बघितल्या. या चित्रपटाच्या ध्वनिमुद्रिका मी मोठ्या तन्मयतेनं ऐकल्या होत्या. कधी रंगात येऊन, ‘प्यार कर ले, नहीं तो फाँसी चढ जाएगाआळवलं होतं. चित्रपटगृहातल्या समूहाला शक्य तितक्या दृष्टिपथात सामावत मी माझ्या जागेवर जाऊन बसलो. दिवसभराच्या कामानं आणि दगदगीनं मी दमलो होतो. शरीर शिणलं, की मनाला विलक्षण उदासीनता येते. दोन्हींचा शीण घालवायला चित्रपटाचं औषध बरं असतं. मी आरामात पाय पसरून बसलो. वेळेचं महत्त्व न जाणणारी माणसं सिनेमा सुरू झाल्यावर दबकत दबकत पुढे सरकतात. काळोख होऊन अ‍ॅस्प्रो, डालडाच्या जाहिराती सुरू झाल्या. त्या कंटाळवाण्या कार्यक्रमाला मी महत्त्व देत नसतो. सिनेमा सुरू झाल्यावर मी हुश केलं. राज कपूरच्यामेरा नाम राजूशी मी ताल धरत असतानाच माझ्या पसरलेल्या पायांवर कुणाचा तरी बेजबाबदार पाय पडला. बाटाच्या रबरी चपलांचा. पायाला गरमीपासून बचावण्याचा जरी फायदा असला तरी अशा ठिकाणी, अशा प्रसंगीबाटाचाशंख झाल्यावाचून राहत नाही. मी अगदी कळवळून विव्हळलो अन् समोरच्या व्यक्तीनं बाजूला सरकून, संकोचल्या आवाजातसॉरीम्हटलं. त्या स्त्रीच्या उंच टाचेच्या सँडलच्या टोकदार हीलचा जोरदार प्रसाद मला मिळाला. वाटेस जाणार्‍या इसमास या अस्त्राचा मार बसला, तर त्याचे काय हाल होत असतील? स्त्रियांनाटिट फॉर टॅटदेता येत नाही म्हणून, नाही तर चांगला प्रतिसाद द्यायचा विचार मनात आला. मी गप्प बसलो, पण नाखुषीनं. एक तर उशिरा यायचं, त्यातून पडद्याकडे अधिर्‍या नजरेनं पाहत धांदरटपणानं चालायचं. मी काहीच न बोलण्यानं ती अधिकच संकोचली असावी. खाली वाकून माझ्याकडे पाहत ती पुनः बोलली,

‘‘रियली, आय अ‍ॅम एक्स्ट्रीम्ली सॉरी.’’ मी पाय मागे घेतला. अन् जरासा चमकलोच. काहीतरी विचित्र संवेदना झाली. खपली उचकटावी तशी. वाटलं, हा आवाज पुन्हा ऐकावा. तो आवाज माझ्या कानांत घुमला. खोल आत शिरला.

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.