Now Reading
पॉलीग्रॅमॉक्रॅसिस् / डॉ. बाळ फोंडके / मेनका / ऑक्टोबर १९८०

पॉलीग्रॅमॉक्रॅसिस् / डॉ. बाळ फोंडके / मेनका / ऑक्टोबर १९८०

Menaka Prakashan

किशोर तिथे पोचला, तेव्हा लंचटाईमची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. हातातल्या घड्याळात पाहिल्याबरोबर तिथे पोचायला वेळ झाल्याची त्याला जाणीव झाली. त्याबरोबरच तो स्वत:वर चिडला. परत जाण्यासाठी तो वळणार तोच कोपऱ्यातली ती जागा अजून रिकामीच असल्याचं त्याच्या लक्षात आलं. मग मात्र जवळ जवळ धावतच जाऊन त्यानं ती अडवली. सीटवरच्या फोम रबरच्या गादीनं त्याच्या या धसमुसळेपणाबद्दल तक्रारही केली, पण तिकडे लक्ष देण्याइतकं आज त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं.

जाणीवपूर्वक केलेल्या तिथल्या काळोखाला त्याचे डोळे सरावताच त्यानं आजूबाजूला पाहिलं. बरेचसे ओळखीचे चेहरे नेहमीच्या जागांवर होते; पण ओळखीचेच, सलगीचे नव्हते. दुसरं कुणी येऊन समोरच्या सीटवर बसण्याची तशी धास्ती नव्हती. तरी अस्वस्थ होऊन त्यानं परत एकदा मनगटावरच्या घड्याळात वेळ पाहिली. अजून वेळ होता.

वेटरनं विचारताच नेहमीप्रमाणे गोल्डन ईगलची त्याला हवी तशी चिल्ड केलेली थंडगार बाटली त्याच्यासमोर आणून ठेवली. ग्लास भरला. एरवी त्यानं त्या वेटरशी दोन-चार शिळोप्याच्या गप्पा मारल्या असत्या, पण आज त्याचा मूडच नव्हता. जिभेला चाळवत घसा थंड करत जाणारा बिअरचा घोटही आज त्याला कॅमॉक्विनइतका कडवट लागला. मनाशीच एक इरसाल शिवी हासडत त्यानं बाटलीवरचं लेबल वाचलं. गोल्डन ईगलचं परिचित लेबल पाहताच त्याचं डोकं जरा उतरलं.

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.