Now Reading
नाव नका छापू / मंदाकिनी गोडसे / मेनका / मे १९९४

नाव नका छापू / मंदाकिनी गोडसे / मेनका / मे १९९४

Menaka Prakashan

ही माझीच गोष्ट. अगदी सुरुवातीची! सर्वांनाच सांगावी असं खूप वाटतंय, पण धीर होत नाहीये. जाहीरपणे सांगावी असंही वाटतंय खूप, पण छे! जमणार नाही मला. म्हणजे झेपणारच नाही. राग येतो माझा मलाच. माझ्याभोवती असलेल्या चौकटींचा. माझ्यावर लादलेल्या तथाकथित सुसंस्कृत सभ्यतेचा! सारी बंधनं आणि चौकटी झुगारून देऊन वाटतं, ओरडून सांगावं साऱ्यांनात्यावेळी नेमकं काय झालं ते! माझा तो जिवंत, रसरशीत अनुभव! मी भोगलेला तो क्षण! आत खोल कुठेतरी जाऊन भिडलेला, पण मी नाही बोलू शकत. माझ्या नावनिशीवार नाही लिहू शकत. त्यासाठीच माझा आत्मा आतल्याआत तळमळतोय. मध्यरात्रीसुद्धा मी भुतासारखी उठून बसते. खूप ओरडावं, रडावं असं वाटतं. काही वेळा तसं घडलंही. मनावर ताबा राहून मी झोपेतून उठून मोठ्यानं रडू लागले. सारं घर माझ्याभोवती गोळा झालं. मला अंजारू-गोंजरू लागलं. माझ्यावर खोल मानसिक परिणाम झालाय म्हणून सांभाळू लागलं. माझ्या नवऱ्यानं पुन्हा पुन्हा सांगितलं, कीआम्ही कुणीही तुला अपराधी समजत नाही. झाली घटना विसरून जा. फक्त पुढे सावधपणानं वाग.’

भावनांचा भर ओसरल्यावर मी म्हटलं, ‘‘तुम्ही मला अपराधी समजण्याचा हा विषयच नाहीये हो. मीच मला अपराधी समजते आहे आणि माझं हे झोपेतून उठणं, सैरभैर होणं, रडणं. तुम्ही सारी ज्या कारणांसाठी समजता आहात ना त्या कारणांसाठी नाहीये ते! त्याची कारणं खूप वेगळी आहेत. अगदी निराळ्या स्तरावरची आहेत. मला ती समजताहेत, पण फक्त मलाच! अगदीत्याक्षणीसुद्धा समजली, पण मी ती कुणाला सांगू शकत नाही. उच्चार करायला गेले, तर जीभ टाळूला चिकटून बसते आणि तोच माझा आतला आक्रोश मला छळतो आहे.’’

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.