Now Reading
त्याची भूमिका / शं. ना. नवरे / मेनका / फेब्रुवारी १९६०

त्याची भूमिका / शं. ना. नवरे / मेनका / फेब्रुवारी १९६०

Menaka Prakashan

मला खरं म्हणजे नाटकाची आवड नाही. नामांकित नटांची नावं दिसली, तर कधीमधी मोह होतो, परंतु तो तेवढ्यापुरताच. पुढेमागे आपण या नटांना पाहिलं नाही, अशी चुटपुट वाटू नये याच एका स्वार्थापोटी हा मोह होतो. आमच्या कंपनीतल्या बड्या पगाराच्या हुद्द्यावर मी आहे म्हणून माझ्या माथी नाटकाची आवड मारण्यात येते आणि गळ्यात मदतीच्या नाटकाचं तिकीट अडकवण्यात येतं. एकच गोष्ट ठीक आहे, की या वयातही मी एकटा आहे. त्यामुळे गळ्यात एकच तिकीट पडतं. या अशा नाटकांना मी बहुधा जात नाहीच. गेलोच तर थोडा वेळ बसून लगेच परत येतो.

रविवार होता. शनिवारी रात्र जागवणाऱ्या भल्या मोठ्या पार्टीची मादकता रोमारोमांत भिनली होती. आदल्या रात्रीचा सुगंध, त्या गप्पा, तो कपबश्यांचा आणि नक्षीदार नाजूक ग्लासांचा किणकिणाट, कोऱ्या कपड्यांची सळसळ, श्रीमंती मोकळेपणानं जवळ आलेले तरुण देह, ओठांच्या महिरपी, हातावर दिल्या-घेतलेल्या नाजूक हातांच्या टाळ्या, त्या नाजूक हातांच्या लाडिक विळख्यात नृत्य करताना घेतलेले झोके... ते आग्रह, ती आर्जवं, ते लाडिक स्वर... सार्याक गोष्टी मनात नृत्य करत होत्या. ब्रेकफास्टनंतर सिगारेट ओढत प्रत्येक गोष्टीची उजळणी होत होती. फ्रेनी कराचीवाला... के मिलर... हिरा चंदनानी... मृदुला दवे... अनामिका देसाई... यांचे ऐश्वर्यावर पोसलेले देह, बोलण्यातला सैलपणा... नीतीची शिथिल झालेली बंधनं...

‘‘साहेब, मी आत येऊ?’’ कुणीतरी दाराशी उभं राहून विचारत होतं.

मी प्रश्नार्थक पाहिलं.

‘‘मी, मी द्वारकानाथ.’’

द्वारकानाथ म्हटल्यावर कुठलीच मूर्ती नजरेसमोर आली नाही. या नावाचा मनुष्य माझ्या आठवणीत नव्हता.

‘‘या, आत या.’’ द्वारकानाथला मी आत बोलावलं.

‘‘मला ओळखलंत ना साहेब?’’

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.