Now Reading
कॅथेराईनची कहाणी / हमीद दलवाई / मेनका / जून १९६१

कॅथेराईनची कहाणी / हमीद दलवाई / मेनका / जून १९६१

Menaka Prakashan

भावेनं एकदा मला एका वेगळ्या जगतातली काही माणसं दाखवायला नेलं.

तोवर मला ती ऐकून माहिती होती. त्यांच्याकडे कधी मी गेलो नव्हतो. त्यांच्याशी बोललो नव्हतो. त्यांना खाणाखुणा केल्या नव्हत्या आणि खुणेनंच त्यांची जात ओळखण्याइतका हुशार बनलो नव्हतो.

ज्यालारेड लाईट स्ट्रीटम्हणतात अशाच वस्तीतून मी तोवर भटक होतो आणि भावेला हे माहीत होतं. परंतु मी अशा धंदेवाईक बायांकडे जाणं त्याला आवडत नसे. अनेक कारणांसाठी तो विरोध करी. अशी उघडी ठिकाणं म्हणजे गुप्तरोगाचे अड्डेच असतात, असं त्याचं म्हणणं असे. ते मला नाकारता येत नसे. परंतुतुझ्या या खासगी धंदा करणार्‍या बायका तरी गुप्तरोगांपासून अलिप्त आहेत कशावरून’, असं त्याला विचारल्यास मात्र तो निरुत्तर होत असे.

अखेर भावेबरोबर जायचं मी एकदा ठरवलं.

त्या दिवशी त्याचा पगार झाला होता. संध्याकाळी सहा वाजता तो मला एका हॉटेलात भेटला. आम्ही दोघांनी मनसोक्त खाऊन घेतलं. त्यानं शंभर रुपयांची एक नोट मोडली आणि पन्नास रुपये माझ्या खिशात घातले. उरलेले पन्नास स्वतःला ठेवले. एकूण प्रकरण फार महाग आहे, हे मी ओळखलं आणि शहाण्यासारखा माझ्या खर्चाचा बोजा त्यानं आपल्या शिरावर घेतल्याबद्दल मनातल्या मनात मी त्याला दुवा दिला.

त्या रात्री त्यानं मला रस्त्यांवरून घुमवलं. चार बायका दाखवल्या. इतर काही खास स्थळंही हुडकून काढली. एका हॉटेलात एक छाकटी पोरगी एकटीच बसलेली पाहून बेधडकपणे तो तिच्याजवळ गेला आणि सौदा पटवण्याच्या गोष्टी बोलू लागला.

या उद्योगात बरीच रात्र झाली आणि भावेचं कसब पाहून मी काहीसा आश्चर्यचकित झालो. त्यानं हुडकलेल्या कुठल्याच मुलीशी मला का कुणास ठाऊक, त्या रात्री रममाण व्हावंसं वाटलं नाही. त्यामुळे पैशांची घासाघीस करायच्या मिषानं मी एक-दोन सौदे फिसकटवले आणि काही जणींना चहा आणि बिस्किटं देऊन वाटेला लावलं.

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.