Now Reading
कल्याण / देविका साने / मेनका / एप्रिल १९९३

कल्याण / देविका साने / मेनका / एप्रिल १९९३

Menaka Prakashan

‘‘आवारातच कार लाव’’ उतरता उतरता सुचित्रानं ड्रायव्हरला बजावलं. ‘‘आणि हे बघ, मला सी. एम. साहेबांकडे ताससुद्धा लागेल. पण तू कार लावून पानपट्टीच्या दुकानावर जाऊ नकोस.’’

‘‘बरं बाई.’’

मंत्रालयातला लिफ्टमन सुचित्राकडे पाहून कळत नकळत हसला. इतरांना त्यानं उर्मटपणानंच कितव्या मजल्यावर जायचंय, असं विचारलं. सुचित्राला सी. एम. साहेबांच्या मजल्यावर जायचं असतं, हे त्याला ठाऊक होतं.

सी. एम.च्या मजल्यावर नेहमीसारखीच गर्दी होती. काही लोक घोळका करून, तर काही काखेत फायली घेऊन एकेकटे उभे होते.

पांढऱ्या कपड्यांतले, पान चघळणारे आणि तंबाखू मळणारे आमदार व्ही. आय. पी. वेटिंग रूममध्ये जागा अडवून बसले होते.

लिफ्टमधून उतरताना सुचित्रानं लिफ्टमधल्या आरशात झटकन नजर टाकली. सकाळीच ती पार्लरमध्ये जाऊन केस सेट करून आली होती. हेअर स्प्रे मारल्यामुळे केस अगदी जाग्यावर आणि ठीकठाक होते. डाव्या हाताच्या करंगळीनं तिनं आपली केसांची बट कपाळावर आणखीनच खेचली.

एकदा बोलता बोलता सी. एम. तिला म्हणाले होते, की गुलाबी रंग सुचित्राच्या गोऱ्या रंगाला खूप उठून दिसतोय आणि त्यामुळे आज लक्षात ठेवून ती गुलाबी, चंदेरी साडी नेसली होती. चंदेरी साडीच्या एकेरी पदरातून तिचं गुलाबी कटोरी ब्लाऊज जरा अधिकच स्पष्ट दिसत होतं. त्यातल्या गोलाईसह! समोरून तर ब्लाऊजचा गळा जरा खोल होताच, पण मागच्या बाजूनं तर जास्तच खोल होता. सुचित्रानं मुद्दामच दोन्ही खांद्यांवरून पदर लपेटून घेतला होता, पण मुळात पदर पारदर्शक आणि एकेरी असल्यामुळे तिच्या पाठीची पन्हळ खोलपर्यंत रुतलेली दिसत होती.

सुचित्रा जेव्हा लिफ्टमधून उतरली, तेव्हा लिफ्टमध्येपॉयझनसेंटचा वास भरून राहिला. सुचित्राला पॉयझन एवढं आवडत नसे. तिलानीना रिक्की जास्त प्रिय होतं. पण सी. एम.नापॉयझनचा वास खूप आवडायचा. त्यामुळे हिंगोरानीनं सुचित्राच्या घरी अर्धा डझन पॉयझन सेंटच्या बाटल्या भेट आणून दिल्या होत्या.

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.