Now Reading
ओळख / मनोहर भागवत / मेनका / जानेवारी १९७२

ओळख / मनोहर भागवत / मेनका / जानेवारी १९७२

Menaka Prakashan

‘‘गेले तीन दिवस तुला घेऊन बाहेर फिरायला जायचं म्हणतोय ते आज जमतंय. सुटलो बुवा या वऱ्हाडी मंडळींच्या गर्दीतून. आता तीन-चार तास तरी घरी जायचंच नाही.’’

‘‘तीन-चार तास?’’

‘‘काय झालं मग? रोजचा किमान एक तास धर, तरी तीन दिवसांचे तीन तास होतातच ना? की माझंच काही चुकतंय?’’

‘‘हिशेब बरोबर. पण नुसता आकड्यांचा. तीन दिवसांचा उपाशी माणूस तिप्पट जेवतो का?’’

‘‘खरंय तुझं, परवा मला एक छानच कल्पना सुचली. सांगू?’’

‘‘हं…’’

‘‘आपल्या पत्रिकेवर आपण छापतो ना, ‘सहकुटुंब सहपरिवार येऊनवगैरे वगैरे त्याखाली वऱ्हाडी मंडळींसाठी एक नम्र सूचना पण द्यायची. ‘आम्हाला सुखाचा संसार चिंतणाऱ्या वऱ्हाडी मंडळींनी आपला मुक्काम लवकर हलवावा... कृपया गैरसमज करून घेऊ नये.’ ’’

‘‘म्हणजे काय होईल?’’

‘‘सुज्ञ मंडळी त्यातला आशय ओळखून आम्हाला उपकृत करतील. याने सं-पू-र्ण मोकळीक देतील. आपण फक्त दोघं. दोघंच...’’

‘‘वऱ्हाडी मंडळी म्हणता तर अशी कोण बाहेरची येऊन घुसली आहेत आगंतुकपणे? दोन्ही बहिणी तुमच्याच. एक मेहुणा, काका-काकू, त्यांची मुलं, तुमची आई, ही परकी का वाटतात तुम्हाला? लग्न म्हटलं की अगदी हक्कानं येऊन राहणारच ती. त्यांच्याबद्दल अशी भावना?’’

‘‘आता कसं सांगू तुला? ही सगळी माणसं माझीच आहेत. त्यांनी माझ्याकडे येऊ नये असं मला कसं वाटेल? पण खरं सांगू, निदान आत्ता तरी त्यांची अडचण वाटतेय. आणखी दोन महिन्यांनी या नि खुशाल पंधरा दिवस राहा म्हणाव.’’

‘‘पण ही वेळ पुन्हा येत नसते नि ती मजा पण...’’

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.