Now Reading
आम्ही दोघी / शं. ना. नवरे / मेनका / दिवाळी १९८०

आम्ही दोघी / शं. ना. नवरे / मेनका / दिवाळी १९८०

Menaka Prakashan

माझा तर उपासच होता. यमीची पोटाची तक्रार. भाताचे चार उंडे गिळून ती पडली होती. पडली होती कसली? सारखी बडबडत होती, शिव्या घालत होती. पोटाला आणि आपल्या पोटच्या पोराला- गंप्याला!

‘‘...बघीन बघीन नायतर विळीवर हे पोट चिरूनच टाकीन.’’

‘‘हा गधडा पस्तिशीला आला. दिडकी कमावत नाय. निस्ता फुकटचं गिळतो. आज्यानं ठेवलीये जमीन म्हणून बरं, नायतर भीकच मागत फिरला असता... पोरगी देणार कोण या म्हसोबाला?’’

‘‘...दोन टायमाला भात खाऊन खाऊन तडतडतंय मेलं.’’

‘‘...आयशीला मच्छी आवडती, पण कदी मच्छी आणायचा नाय कारटा. सोताला मिळत असंल कानूच्या हाटेलात. कानू फुकाटचं नाय पुढ्यात ठेवीत. ही एवढी भांडी घासून घेतो गंप्याकडून.’’

मी माळ ओढत होते आणि यमीचं बोलणं ऐकत होते. यमीला माहीत आहे माझी सवय. आणि देवानं आमचं काय चांगलं केलंय, म्हणून मनापास्नं माळ ओढायची? तर यमी बडबडतानाच मला म्हणाली, ‘‘गौरे, तूच सांग, हा पस्तिशीचा घोडा. यानं आपल्याला म्हातार्‍यांना सांभाळायचं का आपण याला सांभाळायचं?’’

मी काहीच बोलले नाही. मनात मात्र हसले. हसले आणि पुन्हा हसले. देवाच्या नावानं माळ ओढता ओढता मधेचभानू... भानू... भानूअसं ओठांवर आलं.

‘‘गौरे, तुला भानू आठवतो?’’

म्हणून तर पयल्यांदा मी हसले होते. हातातली माळ विसरून खोटंच बोलले, ‘‘कोण गं?’’

‘‘भानू आठवत नाय तुला, रांडे? तेव्हा तर वेडी झाली होतीस त्याच्यावर! त्यानं निस्ता हात फुडं केला असता, तर जाऊन झोपली असतीस त्याच्या पुढ्यात.’’

‘‘हो, झोपले असते! आणि तू गं? कपाळ पांढरं झालं होतं, पदरात गंप्या होता पाच वर्षांचा... तूदेखील भानूवर भाळली नव्हतीस? तो बावडीवर अंघोळीला गेला, की खिडकीतून कोण पाहत बसायचं? तू का मी?’’

सशुल्क कथा

रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा कथेचा मनमुराद आनंद घ्या!

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.