Now Reading
राशीभविष्य

राशीभविष्य

Menaka Prakashan

मेष : सामाजिक भरीव कार्य घडेल
आपला स्वभाव बदलणं शक्य नाही, परंतु आपल्या लहरी स्वभावाला व हट्टाला काही वेळ काबूत ठेवल्यास रोजच्या जीवनात त्याचा परिणाम सुखावह ठरू शकतो. आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील. खर्चावर बंधनं ठेवा. व्यवसाय-धंद्यात अर्थविषयक मदत लागू शकते. जुनी येणी काही प्रमाणात वसूल होतील. जुन्या गुंतवणुकी फलद्रुप होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. नवीन गुंतवणुकी करताना त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी पडेल. व्यवसाय-धंद्यात-नोकरीत नियोजन महत्त्वाचं ठरेल. बदलती परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावेत. कुटुंबातलं वातावरण चांगलं असेल. कुटुंबियांचं मत ऐकून घ्या. ज्येष्ठांच्या मताला प्राधान्य देणं हिताचं ठरेल. कुटुंबातल्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. सामाजिक कार्यात योगदान द्याल.
शुभ दिनांक : १, ४, ८, ११, १५, १९, २२, २४, २८, ३०

वृषभ : उत्साही-आनंदी वातावरणाचा लाभ
एकंदरीत कुटुंबात तसंच बाहेरही उत्साही व आनंदी वातावरणाचा लाभ होईल. कुटुंबात मंगलकार्यं ठरेल. तरुण-तरुणींची शैक्षणिक प्रगती झाल्यामुळे उच्चशिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. नोकरी-व्यवसायात कायद्याची बंधनं पाळणं अत्यावश्यक ठरेल. नोकरीत भाग्योदय मात्र आपल्या कार्यकक्षेत राहूनच काम करा. आपला अधिकार-कक्षा ओळखा. प्रलोभनांपासून दूर राहा. नोकरी-व्यवसायात आपण केलेल्या कार्याची प्रशंसा होईल. कार्यक्षेत्रात दीर्घकालीन विकास योजनांचा अवलंब करणं लाभदायक ठरेल. अपयशानं खचून न जाता कार्यमग्न रहाणं हिताचं ठरेल. अनावश्यक खर्चास कात्री लावा. स्थावर मिळकतीचे व्यवहार गतिमान होतील. राजकीय क्षेत्रात विरोधक डोकं वर काढतील. हितशत्रुंंवर विजय मिळवाल. वैयक्तिक कला, छंद यामधून नावलौकिक व प्रगती होईल.
शुभ दिनांक : १, ५, ६, ८, १५, १९, २१, २५, २८, २९, ३०

मिथुन : कर्तृत्व उजळेल
आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर आपण त्या संधीचं सोनं कराल. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदार्‍या आपण यशस्वीरीत्या पूर्ण कराल. आपलं कर्तृत्व उठून दिसेल. आपल्या मताला कुटुंबात तसंच कार्यस्थळी प्राधान्य मिळेल. नोकरीत विशेष कार्यासाठी आपली निवड होऊ शकते. कुटुंबात मंगलकार्य ठरतील. तसंच तरुण-तरुणींच्या विवाहाबद्दलची बोलणी गतिमान होतील. साहित्यिक, कलाकारांना प्रसिद्धीबरोबर धनलाभ होईल. व्यवसाय-धंद्यात मात्र आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी मदत लागू शकते. त्या दृष्टीनं प्रयत्न केल्यास त्यात यश लाभेल. अडचणी-समस्यांवर मात कराल. आपल्या आवाक्याबाहेरची कार्यं टाळा. कामं मनाजोगती होतील.
शुभ दिनांक : २, ६, १०, ११, १४, २०, २२, २५, २८

कर्क : तडजोडी स्वीकाराव्या लागतील
जमीन-जुमल्याचे व्यवहार तसंच वडिलोपार्जित संपत्ती-मालमत्तेच्या विषयावरून वाद चिघळण्याची शक्यता. कलहात रूपांतर होऊ देऊ नका. भावनाविवश होऊन चुकीचे निर्णय घेतले गेल्यास नुकसान संभवतं. चर्चेमधून मार्ग काढा. तडजोड करावी लागल्यास ते हिताचं ठरेल. व्यावहारिक भागीदारीत वादविवाद टाळा. तसंच सरकारी नियम, कायद्याचं उल्लंघन नको. जुन्या गुंतवणुका लाभप्रद ठरतील. पती-पत्नीमधले संबंध वादविवांदामुळे बिघडू शकतात. इतरांनी दिलेल्या सल्ल्यास अथवा मतास फारसं महत्त्व देऊ नका. आपल्या मनाचं ऐका. ते हिताचं, फायद्याचं ठरेल. आपण कार्यमग्न राहणं महत्त्वाचं ठरेल. प्रतिष्ठेच्या कार्यात गुप्तता बाळगावी लागेल. आपलं नियोजन इतरांना सांगू नका. कुटुंबतल्या मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता मिळाल्यामुळे आनंद होईल.
शुभ दिनांक : ३, ६, १०, १२, १७, १९, २२, २४, २६, २८, ३०

सिंह : शुभकार्याचा योग
दीर्घकालीन लांबणीवर पडलेली कार्यं गतिमान होतील. स्थावर, जमिन-जुमल्यांचे व्यवहार मध्यस्थांमुळे यशस्वी होतील. स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होऊ शकतं तसंच नवीन वाहन खरेदी करू शकाल. कुटुंबातल्या विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्‍चित होतील. तरुण-तरुणींना शिक्षण क्षेत्रात स्पर्धात्मक यश मिळेल. व्यवसाय-धंद्यात जुन्या ओळखींमुळे लाभ होईल. नवीन करार होतील. आर्थिक परिस्थिती समाधानकारक असेल. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना यश, प्रसिद्धी मिळून लोकसंग्रहात वृद्धी होईल. कामाचा व्याप वाढेल. उलाढालींबरोबरच नफ्याचं प्रमाण वाढेल. महत्त्वाची कार्यं पूर्ण करण्यासाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. मार्गदर्शन, सहकार्य मिळेल. स्वत: अतिस्पष्ट बोलून इतरांचा अपमान करू नका.
शुभ दिनांक : २, ५, ६, १०, १४, १७, २०, २२, २४, २६, २७, ३०

कन्या : यशदायी कालावधी
सध्याचं ग्रहमान अनुकूल असल्यानं आजूबाजूच्या वातावरणातून अनुकूलता मिळेल. थोड्याच प्रयत्नांनी आपल्यासमोरची कार्यंं पूर्ण होत असलेली पाहून आश्‍चर्य वाटेल. तरुण-तरुणींना विशेष शुभ. प्रेमात यश मिळेेल. कुुटुंबातल्या विवाहेच्छुक तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. ज्यांचे विवााह ठरण्याचं लांबत चाललं होतं, अशांचे विवाह निश्‍चित होतील. ओळखी-मध्यस्थी फलद्रुप होतील. बेरोजगाांना नोकरी मिळून नोकरीची समस्या सुटेल. नोकरीसाठी पूर्वी दिलेली मुलाखत यशस्वी झालेली अनुभवाल. व्यवसाय-धंद्यात नवं नियोजन यशस्वी होऊन व्यवसाय-धंद्याची नवीन सुधारीत घडी बसवण्यात यश मिळेल. आपल्या स्वत:च्या मालकीच्या जागेत व्यवसाय करू शकाल. मात्र जुगारसदृश्य व्यवहारांपासून लांब राहा. पुत्रचिंता जाईल. कामात उत्साह व उमेद वाढून व्यावसायिक प्रगती कराल. प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभेल.
शुभ दिनांक : ३, ५, ९, ११, १३, १८, २०, २५, २६, २९, ३०

तूळ : अनपेक्षित लाभ
या कालावधीमध्ये अनपेक्षितरीत्या अवघड वाटणारी किंवा दीर्घकालीन प्रलंबित असलेली कार्यं पूर्ण होतील. अनेकानेक मार्गांनी धनागमन. कुटुंबातल्या तरुण-तरुणींना नोकरी मिळवणं सोपं जाईल. पूर्वी दिलेल्या मुलाखतीद्वारे नोकरीचं बोलावणं येऊ शकतं. काहींचे विवाह ठरतील. परिचयोत्तर विवाह निश्‍चित होतील. तसंच विद्यार्थ्यांचं परदेशगमनाचं स्वप्न साकार होईल. उच्चशिक्षणाच्या मार्गातले अडथळे दूर होतील. व्यवसायामध्ये जुनी येणी वसूल होण्याचं प्रमाण वाढल्यानं व्यवसायाची घडी मनाप्रमाणे बसवू शकाल. मात्र भागीदाराशी जमवून घ्यावं लागेल. मतभेद टाळा. व्यावसायिक प्रतिष्ठेचा लाभ. निरनिराळ्या उत्सव-समारंभाची आमंत्रणं येतील. राजकारणी जातकांनी अतिधाडस व स्पर्धा करण्यापेक्षा आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करावं. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. तसंच इतरांचा अपमान करू नये.
शुभ दिनांक : १, ७, १०, ११, १९, २३, २५, २८, ३०

वृश्‍चिक : जोडीदाराचा भाग्योदय
नोकरी-व्यवसायात ‘अच्छे दिन!’ कार्यस्थळी अनुकूल घटना घडतील. उत्साह-उमेद वाढेल. आपल्या समोरचं कार्य वेगानं पार पाडाल. आत्तापर्यंत ज्या सरकारी कार्यातलं यश लांबत चाललं होतं, ती कार्यं पूर्ण होतील. मात्र कायद्याच्या चौकटीत राहणं महत्त्वाचं ठरेल. व्यावसायिक उलाढाल वाढून नफ्याचं प्रमाण वाढेल. नवीन कायदेशीर सौदे हाती लागून दीर्घमुदतीचे करार होतील. परदेशी संबंध येऊ शकतो. सरकारी योजनांचा लाभ मिळेल. मात्र स्पर्धक व हितशत्रूंच्या कारवाया वाढू शकतात. शांतपणे निर्णय घ्या. कार्याकडे लक्ष केंद्रित करा. कुटुंबातलं वातावरण सुसह्य राहून पती अथवा पत्नीचा अचानक झालेला भाग्योदय आश्‍चर्यचकित करेल. पुत्रोत्कर्ष होईल. उत्तम प्रवासाचे योग. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. वाहतुकीचे नियम पाळणं गरजेचं!
शुभ दिनांक : २, ६, १०, १५, २०, २५, २६, २९, ३०

धनु : संयमाला प्रयत्नांची जोड हवी
आत्तापर्यंत केलेलं नियोजन सफल होताना दिसेल. मात्र अपेक्षित कार्यसफलेकरता संयमाला प्रयत्नांची जोड हवी. कार्यमग्न राहणं महत्त्वाचं ठरेल. कार्यक्षेत्री, कुटुंबात होणारे वादविवाद त्वरीत मिटवणं हिताचं. इतरांच्या मतास प्राधान्य द्या. तसंच लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज भासेल. व्यवसायातली महत्त्वाची कामं वेगळी कराल. स्थावर मिळकत, जमीन-जुमल्यांच्या थांबलेल्या व्यवहारांना गती मिळेल. मध्यस्थी यशस्वी होतील. तरुण-तरुणींना अनुकूल कालावधी. आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाल्यानं उत्साह वाढेल. नोकरीत राजकारण व गटबाजीपासून दूर राहा. तसंच प्रलोभनं टाळा. आपल्या क्षेत्रातलं ज्ञान अद्यावत ठेवणं हितकारक राहील. काहींचं विवाहाचं स्वप्न साकार होईल. महत्त्वाची कागदपत्रं, वाहन, मौल्यवान चीजवस्तू सांभाळा. चोरीची शक्यता!
शुभ दिनांक : ३, ६, ११, १७, २०, २२, २३, २७, २९, ३०

मकर : प्रगती-उन्नती होईल
अनुकूल ग्रहमानामुळे प्रगतीचा वेग वाढेल. पूर्वी केलेलं नियोजन यशस्वी होईल. तसंच कार्यक्षेत्री नव्या योजनांना, नियोजनाला गती मिळेल. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. अर्थमान उंचावल्यामुळे व्यवसायात महत्त्वाचे बदल करू शकाल. हे बदल व्यवसाय-धंद्यासाठी पोषक ठरतील. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत, अशांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येईल. कौटुंबिक पातळीवर थोडे मतभेद, कुरबुरी वाढल्यामुळे मानसिक अस्वस्थता वाढेल. मतभेद टाळा. ज्येष्ठांच्या मतास प्राधान्य द्या. बरेच दिवस मनात अललेलं स्वत:च्या वास्तुचं स्वप्न साकार होऊ शकतं. अचानक धनलाभ झाल्यामुळे आश्‍चर्य वाटेल. मात्र जुगारसदृश्य व्यवहार नको. तसंच मित्रमंडळींच्या वर्तुळात सामंजस्यानं घ्या. वाद-विवाद-मतभेदांची शक्यता. अति आत्मविश्‍वास, धाडस घातक ठरू शकतं. सरकारी नियम पाळा.
शुभ दिनांक : ४, ५, १२, १७, २०, २१, २७, २९

कुंभ : नवीन नवीन संधींचा लाभ
आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्यानं समाधानी, उत्साही राहाल. कार्यक्षेत्री आपल्या मतास महत्त्व प्राप्त होईल. नोकरीत आतापर्यंत केलेल्या कार्याची प्रशंसा होईल. वरिष्ठांशी संबंध सुधारून त्यांचं व सहकार्‍यांचं सहका?र्य मिळेल. एखाद्या विशिष्ट कार्यासाठी आपली निवड होईल. परदेशगमनाच्या संधी. आत्मविश्‍वास वाढेल. मात्र आपल्या खासगी बाबींची चर्चा इतरांबरोबर करणं टाळा. तरुण-तरुणींचा भाग्योदय. विवाहाचे प्रश्‍न सुटतील. काहींच्या कुटुंबात मंगलकार्याचा योग तसंच नवीन वाहन खरेदी करू शकाल. साहित्यिक, कलाकार यांच्या गुणांना वाव मिळेल. नवीन कामांचे करार होतील. प्रसिद्धीसह मानधनात वृद्धी झाल्यानं खूष असाल. अनपेक्षित संधी मिळेल. व्यवसायातली वादग्रस्त येणी येतील. सामाजिक मान-सन्मानात वृद्धी होऊन लोकसंग्रह वाढेल. मात्र स्त्री चिंता सतावू शकते.
शुभ दिनांक : ३, ५, १०, १४, १६, १८, २१, २३, २८, ३०

मीन : वास्तु योग
भूतकाळातल्या अप्रिय घटनांचा विचार टाळावा. शिस्त-संयम-कष्ट करण्याची तयारी या त्रिसूत्रीमुळे आपल्या प्रगतीचा वेग कायम राहील. मात्र प्रयत्नात कमी नको. कार्यमग्न रहाणं हिताचं ठरेल. कुटुंबातल्या मुला-मुलींचा भाग्योदय. राहत्या घराचे प्रश्‍न संपुष्टात येऊन आपल्या स्वत:च्या वास्तूत जाण्याचे योग. तसंच व्यवसायाची जागाही बदलू शकाल. नोकरीतलं वातावरण चांगलं राहील. पदोन्नती-वेतनवृद्धीसारख्या घटना समाधान देतील. मात्र बदलीची शक्यता तसंच कामाच्या स्वरूपात बदल घडेल. मान-सन्मान मिळेल. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींवर अतिरक्त कार्यभार सोपवला जाऊन जबाबदारी वाढेल. तरुण-तरुणींना नोकरी मिळेल. मित्रमंडळींच्या वर्तुळात वावरताना सावध राहा. मुर्खांच्या नंदनवनात रमू नका. नवपरिणितांना शुभ. प्रेमप्रकरणापासून जरा जपूनच रहा. गैरसमजातून संबंध बिघडू शकतात.
शुभ दिनांक : २, ३, ९, ११, १७, १९, २१, २४, २८, ३०

ज्योतिषभूषण: डॉ. सविता महाडिक

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.